Home Entertainment राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त दत्तोबा तांबे शिरोलीकर यांचे चिरंजीव पखवाद सम्राट ह-भ-प नंदू...

राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त दत्तोबा तांबे शिरोलीकर यांचे चिरंजीव पखवाद सम्राट ह-भ-प नंदू तांबे

कोरोना संकटाने उपासमार

तमाशा अभ्यासक काशिनाथ आल्हाट

नारायणगाव(प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा कलेच्या माध्यमातून ज्यांच्या नऊ पिढ्या या तमाशा रसिकांच्या साठी खर्ची झाल्या. ते प्रसिद्ध तमाशा फडमालक स्व.दगडू साळी शिरोलीकर दगडू साळी शिरोलीकर म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील सोंगाड्या होते . त्यांची ओळख म्हणजे सोंगड्याचा सोंगाड्या अशी होती.

सन 1920 साली इंदोरच्या राजदरबारात , तसेच बडोदा येथे सयाजीराव गायकवाड महाराजांच्या दरबारात तमाशा सादर केला .महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता .उज्जैनच्या राजदरबार दरबारात शेलापागोटे देऊन दगडोबांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांचे चिरंजीव राष्ट्रपती पारितोषिक विजेते स्व.दत्तोबा तांबे शिरोलीकर तमाशा इतिहासातील महत्त्वाचे नाव आहे

.दत्तोबा तांबे हे स्वतः वगनाट्य लिहित. दत्तोबा तांबे यांच्यासारखा दूरदृष्टीचा तमाशा कलावंत होणे नाही .नेफा आघाडीवर सन 1962 साली जाऊन भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्याचे त्यांनी कार्य केले. त्यांचे चिरंजीव प्रसिद्ध ढोलकी वादक व प्रसिद्ध पखवाद वादक ह-भ-प कीर्तनकार नंदू तांबे यांची कोरोना महामारीने

त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .
स्व दत्तोबा तांबे यांच्या भरभराटीमध्ये नंदू तांबे हे एकीकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकी वादक होते.

महाराष्ट्रातील तमाशा रसिकांची सेवा करत करत घरचा तमाशा फड मोडकळीस आला। आर्थिक संकटाने वाताहत झाली. शेवटी तमाशा फड बंद करावा लागला .
नंतरच्या कालखंडात स्वतः नंदू तांबे यांनी स्वतःचा तमाशा फड चालू केला .तोही आर्थिक संकटात आला. नंदू तांबे हे ज्याप्रमाणे तमाशा क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे जन्मल्यानंतर 8 दिवशी

गोकूळचा चोर
या तमाशातील वगनाट्य त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका त्यांनी केली होती. वयाच्या 47 वर्षानंतर त्यांनी नंतर वारकरी संप्रदायाचा मार्ग स्विकारून आज 26 वर्षे वारकरी क्षेत्रात उत्तम प्रकारचे कीर्तनकार आणि पखवाद वादक म्हणून त्यांचा नावलौकिक प्राप्त झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या नामचिंतनाने दोन वेळेच्या पोटाचा प्रश्न निश्चित सुटलेला होता . त्याच दरम्यान नियतीने घाला घातला. आणि त्यांची त्यांच्या धर्मपत्नीचे निधन झाले. प्रपंच उघड्यावरती पडला.तरीही नंदू महाराज तांबे डगमगले नाही. परंतु आता त्यांच्यावर दोन नातवंडे ,एक मुलगा असा परिवार असल्याने या कोरोणाच्या संकटनांमध्ये कीर्तन, सप्ताह या सर्व गोष्टी बंद असल्याने. आज प्रसिद्ध कीर्तनकार पखवाद वादक ह .भ. प .नंदू महाराज तांबे यांच्या वरती उपासमारीची वेळ आली आहे . संप्रदायाचा वसा आणि वारसा लाभलेल्या भक्तांनी आणि तमाशा रसिकांनी ह.भ.प. नंदू तांबे यांना या उपासमारीत मदत करावी . सध्या ते हडपसर येथील मांजरी येथे भाड्याच्या खोलीत राहत आहेत त्यांना मदतीची अपेक्षा आहे.

2 COMMENTS

  1. Hi , I do believe this is an excellent blog. I stumbled upon it on Yahoo , i will come back once again. Money and freedom is the best way to change, may you be rich and help other people.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here