घात की अपघात..? निपाणी वडगाव हद्दीत अनोळखी तरुणाचा मृतदेह..!

श्रीरामपूर : शहराजवळील निपाणी वडगाव शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेची धडक बसल्याने संबंधित तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 29 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता हा मृतदेह आढळला असला तरी अद्याप त्याची ओळख पटली नाही. मृत तरुणाचे वय अंदाजे 35 वर्षे असून डोक्याचे केस बारीक आणि नाक बसके आहे. बारीक मिशी आणि यू आकाराची दाढी असून हा तरुण रंगाने काळासावळा आहे.

अंगात काळ्या रंगाचा शर्ट त्यावर थुली फुले असलेली डिझाइन, शर्टच्या आतून गुलाबी डार्क रंगाचा बंद गळ्याचा टीशर्ट, राखाडी रंगाची पँट व अंडरवियर पॅन्टला काळ्या रंगाचा बेल्ट असून पायात काळ्या रंगाचे सॅंडल आहेत.

वरील वर्णनाचा इसम आपल्या कोणाच्या ओळखीचा असल्यास श्रीरामपूर पोलिस पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे, तपासी अंमलदार पोलीस नाईक दिघे आणि पोलीस नाईक दुधाडे यांनी केले आहे. दरम्यान, हा रेल्वे अपघात आहे की घातपात? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here