Banking: बँक कर्ज हप्ते थांबवा अन्यथा आंदोलन- देवेंद्र लांबे

पाच मे पर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

राहुरी – लॉकडाऊनमुळे व्यापार व्यवसाय बंद असून बँकांनी पठाणी वसुली चालवली आहे. सरकारने तातडीने अध्यादेश काढून बँकांना ही वसुली थांबवण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा पाच मे रोजी अखिल भारतीय छावाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबी यांनी दिला आहे.

अखिल भारतीय छावा संघटनेचे नगर जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांच्या माध्यमातून व ऑनलाईन अर्ज करुन व्यावसायिक कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावे व लॉकडाऊन काळात व्यवसायिक दुकानांचे लाईट बिल माफ करण्याची मागणी १५ एप्रिल२१ रोजी केली होती, परंतु सरकारने ३० एप्रिल २०२१ पर्यन्त कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

निवेदनात म्हंटले आहे की, सन २०२० या सालात करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यापार्‍यांचे पूर्ण वर्ष नुकसानीत गेले होते. मागील वर्षाचा झालेले नुकसान भरून काढता काढता २०२१ लागले. सर्वसामान्य व्यापारी कसाबसा या परिस्थितीशी झुंज देत व्यवसाय करत होता.

त्यात पुन्हा लॉकडाऊन पुकारल्यामुळे सर्व सामान्य व्यावसायिक पुर्णपणे हवालदिल झालेला आहे. सरकारच्या अवाहनाला दाद देत छोटे मोठे व्यवसाय बंद ठेवले आहेत.

परंतु व्यवसाय बंद ठेवूनदेखील दुकानातील लाईट बिल, कामगारांचे पगार, जागेचे भाडे, व्यापारी देणे तसेच व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते भरावी लागणार आहेत.

व्यवसाय बंद असल्यानंतर व्यापारी कुठलेही देयके भरू शकणार नाहीत, तसेच बँक कर्जाचे हप्ते देखील भरू शकणार नाहीत. व्यावसायिक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सदर कर्जखाते थकीत मध्ये गेल्यामुळे भविष्यकाळात व्यवसायिकांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करणार आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्रांनी ज्या कर्ज खातेदारांची बँक कर्ज हप्ता भरण्याची परिस्थिती नाही अशा व्यवसायिकांना कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी व संबधित कर्ज खाते थकीत मध्ये जाणार नाही अशी तरतूद करावी. तसेच बंद काळातील दुकानांचे लाईट बिल माफ करावे अशी केली आहे.

सरकारने ५ मे २०२१ पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास सरकारच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने कुठलीही पूर्व कल्पना न देता कर्जदार व्यवसायिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद सरकारने घ्यावी व होणार्‍या आंदोलनाची जबाबदारी ही सबंधीत प्रशासनाची असेल असा इशारा अ.भा.छावा चे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिला आहे.

91 COMMENTS

  1. I do agree with all of the ideas you have presented in your post. They’re very convincing and will certainly work. Still, the posts are too short for starters. Could you please extend them a little from next time? Thanks for the post.

  2. Wow that was odd. I just wrote an incredibly long comment but after I clicked submit my comment didn’t appear. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyways, just wanted to say excellent blog!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here