Ambulance: अल्प दरात रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल…

देवळाली प्रवरा मध्ये नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण…

संतोष जाधव । राष्ट्र सह्याद्री :
राहुरी :
चैतन्य मिल्क चे गणेश दादा भांड, आर.पी.आय. चे सुरेंद्र थोरात यांचे सहकार्याने व लोकसहभागातून आणि देवळाली प्रवरा माल वाहतूक टेम्पो चालक मालक संघटनेची अल्प दरात रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होऊन देवळाली प्रवरा मध्ये या नवीन रुग्णवाहिकेचे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण झाले.
देवळाली प्रवरा बाजारतळ येथे आज दि. ४ मे रोजी मा. आ. लहु कानडे, नाशिक म्हाडा चे अध्यक्ष शिवाजी ढवळे, प्रांत डॉ दयानंद जगतात, तहसीलदार फसियोद्दीन शेख, मुख्याधिकारी अजित निकात, चैतन्य मिल्कचे गणेश भांड, आर.पी.आय. जिल्हा अधक्ष्य सुरेंद्र थोरात, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, शिवसेना शहरप्रमुख सुनीलभाऊ कराळे, पत्रकार रफिक शेख, गणेश विघे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, चेतन कदम, डॉ सचिन कोठुले, गंगाधर गायकवाड, टेम्पो चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here