Corona Effect: हाताला काम नाही तर खायचं काय . . .?

रोजंदार मजुरांना जगण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

कोल्हापूर :
हाताला काम नाही तर खायचं काय . . ? हा प्रश्न आहे हातावर पोट असणाऱ्या सर्व रोजंदर मजुर वर्गाचा गेले वर्षभर कोरोना सारखी महामारी अवघ्या जगासह भारत देशात ठाण मांडून बसली आहे.आणि सततच्या लॉकडॉऊनमुळे हाताला काम नसल्याने कुटुंब कसे चालवायचे याच विवंचनेने सर्व सामान्य जनता आहे.हातावर पोट असणाऱ्यांना मात्र या कोरोना महामारीमुळे नाहक त्रास सोसावा लागत आहे.

गेले वर्षभर चिनसह अवघ्या जगात कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने रुद्र रूप धारण करत धुमाखुळ घातला आणि अवघे जग याचे परिणाम भोगत आहे.जसजसा या महामारी चा सर्वत्र फैलाव दिसू लागला तसेतसे मागील वर्षांपासून सर्व उद्योगधंदे ,कंपन्याही बंद झाल्या.सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने सर्व मजुर अन नोकरी करत असलेल्या कामगारांना जीव वाचवण्यासाठी “गड्या आपला गावं बरा” म्हणत घरचा रस्ता धरावा लागला.
मध्यंतरीच्या काळात कोरोनाने काही अंशी का असेना विश्रांती घेतली होती.त्यामुळे थोडेपार का असेना जनजीवन सुरळीत मार्गावर येऊन ठेपते आहे तोच आणखी कोरोनाने डोके वर काढले आणि पुन्हा एकदा या महामारीला सामोरे जावे लागत आहे.

या महामारी ला जनता बळी पडू नये यासाठी सरकारला वारंवार संचार बंदी सारखे निर्णय घ्यावे लागत आहे.त्यामुळे जनतेला आणि रोजंदारी मजुरांना नाहक त्रास होत आहे.

देशात अनेक लोक असे आहेत त्यामध्ये हात चालले तर चुल पेटते .अनेकजण शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर, नाभिक, सुतार, भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक, कुंभार, रंगकाम करणारे मजूर, हॉटेल कर्मचारी, चर खोदणारे कामगार,आदी वेगवेगळ्या व्यवसायातील मजूर सद्या तरी फार अडचणीतून जात आहे.

ठोस उपाय योजनेची गरज …?

सध्याचे वास्तव पाहता कामधंदे बंद असल्याने सर्वसामान्य जनता एका कठीण परस्थितीतून वावरत आहे.अशा लोकांच्या साठी सरकारकडून मदतीची अपेक्षा होत आहे.

उदासीन जनता . . .


गेले वर्षभर कोरोनाचा वावर सुरू असल्याने उदासीनतेला सामोरे जावे लागत आहे.मनासारखी मोकळीक नसल्याने मानवी जीवन बंदिस्त पोपटाप्रमाने झाले आहे. हौस नाही की मौज नाही.सारे जीवन उदासीतेमुळे ग्रासले आहे.

सण उत्सवावर गदा . . .

गेले वर्षभर गर्दीचा महापूर होऊ नये म्हणून कुठे सण, उत्सव, यात्रा – जत्रा साजऱ्या झाल्या नाहीत. शासन आदेशानुसार जनतेनकडून तंतोतंत नियमांचे पालन होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here