Politics : संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी अरुण चांभारे

प्रभाकर जाधव

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील महसुल विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परीषद सदस्य अरुण चांभारे यांची निवड झाल्याची माहिती समितीच्या सचिव तथा खेडच्या तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शिफारशी नुसार संजय गाधी निराधार अनुदान समिती योजनेच्या तालुकास्तरीय समिती अखेर दीड वर्षानंतर गठीत झाली आहे. या समितीवर सदस्य म्हणुन चिखलगावच्या सुजाता पंचपिंड, चाकणचे सागर बनकर, मेदनकरवाडीचे संजय वाघमारे, आसखेडचे कैलास लिंभोरे, राजगुरुनगरचे विद्याधर साळवे, सुनिल थिगळे, बबनराव शिवले, दिपक थिगळे, राहुल कुंभार यांच्या नेमणुका २७ एप्रिल २०२१ च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये करण्यात आल्या आहेत. मात्र या निवडीत महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला आहे का ? असा प्रश्न शिवसेना, काँग्रेस च्या अनेक कार्यकर्त्यांकडून चर्चिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here