Crime: प्रेमप्रकरणातून गोळीबार..पण सत्य लपवण्यासाठी केला बनाव!

नेवासा पोलीसांकडुन भेंडा गोळीबार प्रकरणाची 24 तासात उकल…

जखमी फिर्यादी व त्यांच्या मित्रांनीच केला बनाव…

सराईत गुन्हेगारांसह 10 जणांना शिताफीने केली अटक  

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथे सोमनाथ तांबे या तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी धक्कादायक सत्य समोर आले आहेत. तांबे याने मित्रांशी संगणमत करून खोटी फिर्याद दिली, असे पोलीस तपासात उघड झाले असून फिर्यादीत आरोपी म्हणून समावेश केलेल्या दोघांचाही या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. तांबे याच्यावर प्रेमप्रकरणातून गोळीबार झाला. त्याच्या मित्रांनीच गोळीबार करणाऱ्यांना पळून लावले आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दुसऱ्या दोघांची नावे फिर्यादीत दिली. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी सह पोलिसांनी एकूण दहा जणांना अटक केली आहे.

  भेंडा परिसरातील लांडेवाडी येथे 2 मे रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास हॉलीबॉल खेळणाऱ्या सोमनाथ तांबे या तरुणावर गोळीबार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती जखमी तांबे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पप्पू जावळे आणि गणेश पुंड या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता मात्र नावानिशी फिर्याद दिल्याने तसेच फिर्यादीत संदिग्धता असल्याने पोलिसांना त्याबाबत संशय होता. पप्पू जावळे हा घटना घडली त्यावेळी त्यांच्या हॉटेलवर असल्याचे  सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले.    दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिक्षक सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक विजय करे, सपोनि. ठाकुर, दाते यांनी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी २४ तासात ५० पेक्षा जास्त साक्षीदाराकडे गुन्ह्याबाबत चौकशी करुन गोळीबार करणारे आरोपी जेरबंद केले.      

या प्रकरणी आज नेवासा पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार, यातील फिर्यादी सोमनाथ तांबे  हा २ मे रोजी सायंकाळी त्याचा मित्र  स्वप्नील बोधक याचेकडे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आला होता. त्याचवेळी त्यांचा मित्र शुभम विश्वनाथ गर्जे (रा.वडुले) हा देखील त्या ठिकाणी आला. शुभम याचे मित्र  अमोल राजेंद्र शेजवळ (वय २२ वर्षे रा अंबिकानगर , सोनई), अमोल अशोक गडाख (वय २२ गडाखवस्ती सोनई),  अक्षय रामदास चेमटे (रा.घोडेगाव) यांनी शिंगणापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करुन एक व्यक्तीला कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.    

   त्यानंतर शुभम गर्जे हा त्यांना घेण्यासाठी वडाळा पाटी येथे जावुन त्या तिघांना व्हॉलिबॉल खेळत असलेल्या भेंडा येथील मैदानावर घेवुन आला.  शुभम विश्वनाथ गर्जे,  स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ, सोमनाथ तांबे हे लांडेवाडी, भेडा येथील मैदानावर सायंकाळी हजर असताना त्यातील अक्षय चेमटे याने मुलीचे कारणावरून त्याचे हातातील गावठी पिस्तुलातुन सोमनाथ तांबे याचे छातीवर गोळी मारली. त्यात सोमनाथ तांबे जखमी होवुन खाली कोसळला. त्यावेळी वरील सर्वांनी कट करुन यातील अमोल अशोक गडाख, अक्षय चेमटे, अमोल शेजवळ यांना गावठी कट्यासह पळवुन लावले.      

सोमनाथ तांबे याने पप्पू जावळे, गणेश पुंड यांनी गोळीबार केला, असे खोटे नाव सांगुन पोलिसांची दिशाभुल केली. परंतु तपासाअंती सदरचा गोळीबार अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेद्र शेजवळ यांनी केला व यातील आरोपी  शुभम विश्वनाथ गर्जे (रा.वडुले) स्वप्नील बाबासाहेब बोधक (रा.लांडेवाडी , भेंडा) यांनी खोटा बनाव करुन दिशाभुल केली व आरोपी पळवून लावले.        त्यानंतर शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील ओंकार राजेंद्र काकड़े, प्रसाद शिवाजी दळवी, अक्षय संजय हाफशेटे यांनी आरोपींना आश्रय दिला व राहण्याची व्यवस्था केली. तसेच शुभम किशोर जोशी याने आरोपीकडील गावठी कट्ट्याचे जिवंत काडतुस स्वतःजवळ ठेवुन घेतली. सचिन साहेबराव काते (रा. सामनगाव , शेवगाव) याने आरोपींना लपवुन ठेवण्यासाठी व आरोपींना मदत व्हावी म्हणुन आरोपींना लॉजिंग करून दिली व त्यांची राहण्याची व्यवस्था केला.       

केवळ 24 तासात हा सर्व घटनाक्रम उघडकीस आणताना आरोपींना नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांचे  यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली.       

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल   गावठी कट्टा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे, अमोल राजेंद्र शेजवळ यांनी शनिशिंगणापुर पोलिस स्टेशन हद्दीत गभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर वेगवेगळे ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वरील आरोपीकडे प्राणघातक शस्त्रे होती व ते अहमदनगर जिल्हातुन बीड जिल्ह्यात पसार  होणार होते अशी माहीती आरोपींनी दिली आहे. पोलिस निरीक्षक विजय करे, सपोनि विजय ठाकुर, तपास पथकाचे पोसई भरत दाते, पोना राहुल यादव, पोना महेश कचे, पोना सुहास गायकवाड, पोकॉ वशिम इनामदार, पोका गणेश इथापे, पोका गुजाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here