Health : अपघातग्रस्त युवकाच्या उपचारासाठी मदतीची गरज

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे,(प्रतिनिधी) : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या युवकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला.

अक्षय दत्तात्रय टाकळकर(वय २१, रा.निमगाव म्हाळुंगी,ता.शिरूर ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार (दि.२) रोजी अक्षय हा नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका झाडाखाली कंपनीच्या बसची वाट पाहत उभा होता.यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या आय-२० (MH 14 CH 3244) या कारच्या चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने कारची त्याला धडक बसली.या अपघातात अक्षयच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा होऊन मेंदूभोवती अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तो जागेवर बेशुद्ध पडला.सध्या त्याच्यावर पुण्यातील सह्याद्री मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


अक्षय हा एका छोट्या शेतकरी कुटुंबातील अतिशय प्रामाणिक आणि कष्टकरी मुलगा आहे.नुकतीच त्याने आपली नोकरी सुरू केली होती आणि त्याचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे.त्याचा वैद्यकीय खर्च त्याच्या कुटुंबाच्या ऐपतीपेक्षा जास्त असल्याने ज्यांना शक्य होईल त्यांनी खालील नंबरवर आपली मदत पाठवावी असे आवाहन त्याच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
फोन पे- 9552652092
बँक अकाउंट नंबर-२२२३३३००१८३५३१८२
आयएफएससी कोड- RATNOVAAPIS

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here