राजुरी गावातील शेतकरी व युवक वर्गकडून कोविड सेंटर ला 40 हजाराची मदत.

बापू मुळीक

सासवड :प्रतिनिधी : राजुरी (ता. पुरंदर )येथील भगतवस्ती, शेतकरी व युवक वर्ग यांच्याकडून ग्रामीण संस्था संचालित आनंदी जम्बो कोविड सेंटर ला रोख 40 हजार रुपयांची मदत केली. तसेच रामचंद्र भगत व सुदाम भगत बंधूनी 1 हजार अंडी तर विलास भगत यांनी 300 किलो टरबूज दिले. यासाठी संतोष भगत, स्वप्नील मुळीक,सचिन भगत, महेंद्र भगत, राजेंद्र भगत, अनिल भगत, बापु भगत, तानाजी भगत, अनिकेत भगत, निलेश भगत, प्रकाश भगत, आबासो भगत, दत्तात्रय भगत, मनोहर भगत यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here