शेतकरी कुटुंबावर  20 ते 25 जणांचा जीवघेणा हल्ला, संचार बंदीचे उल्लंघन

राहाता तालुक्यातील वाकडी येथील घटना
पोलिसांची भूमिका संशययास्पद 

वाकडी :-

राहाता तालुक्यातील वाकडी येथील नांदूर खंडाळा रस्त्यावर असलेल्या लांडेवाडी वस्तीतील सख्या भावाच्या जमिनीच्या वादातून एका शेतकरी कुटुंबावर बाहेरील गावच्या सुमारे 20ते 25 जणांच्या हत्यारबंद टोळक्याकडून जीवघेणा हल्ला झाली असल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, राहाता तालुक्यातील वाकडी येथील नांदूर खंडाळा रस्त्यावर असलेल्या लांडेवाडी येथील दोन सख्या भावात कित्येक दिवसापासून जमिनीच्या वाटपावरून वाद सुरु होते दिवसेंदिवस हे वाद विकोपाला जात होते. असे असताना 6 में रोजी या दोन कुटुंबात हाणामार झाली या हाणामारीत दोन जन साखर कामगार येथे भर्ती करण्यात आले.

त्यानंतर याच रात्री सुमारे रात्री 9 च्या दरम्यान भावबंदकी वाद असलेल्या शेतकरी कुटुंबावार नांदुर्खी व दहेगावं येथील 20 ते 25 जणांच्या जमावंकडून तीक्ष्ण हत्यारासह बेदम मारहाण करण्यात आली असल्याची माहित समजते. यावेळी या जमावने शेतकरी कुटुंबातील घरातील महिला, मुली व पुरुषांना बेदम मारहाण करत घरातील सामानाची तोडफोड करून सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्याद दाखल आहे मात्र असे असताना रात्री 9 नंतर बाहेरील गावचा मोठा जनसमुदाय एका शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून गेला असताना पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. या मोठया दहशत व जीवघेण्या घटनेत अद्याप कोणासही अटक नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. रात्रीच्या सुमारास एवढी मोठी दरोडेखोर सारखी घटना घडली असताना पोलीस प्रशासन मात्र सुन्न अवस्थेत दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here