रेमडेसिव्हीरची काळ्या बाजारात विक्री करणारे आरोपी जेरबंद

एकूण ११,७०,९४० रु . किंमतीचा मुद्देमाल जप्त


नगर –


 रेमडेसिव्हीर इंजेक्शनची काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारे चार आरोपी सहा रेमडेसिव्हीर इंजेक्शन , वाहने , मोबाईल व रोख रक्कम असे एकूण ११,७०,९ ४० रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना यासंदर्भात अटक करण्यात आली आहे.
 

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा बहिरोबा , ता . नेवासा येथे एक इसम हा  रेमडेसिव्हीर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे अशोक राठोड
 त्यानंतर पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे , सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, पोसई गणेश इंगळे , पोना  सुरेश माळी , प्रकाश वाघ ,शंकर चौधरी ,संतोष लोढे , लक्ष्मण खोकले , दिपक शिंदे , पोका रविन्द्र घुगासे , संदीप पवार ,मेघराज कोल्हे , योगेश सातपूते , चालक पोहेकों उमाकांत गावडे अशांनी मिळून कारवाईचे नियोजन करत बनावट ग्राहकाचे मध्यस्थीने  रेमडेसिव्हीर बाबत विचारपूस केली असता सदर इसमाने दोन इंजेक्शन विक्रीसाठी असून एका इंजेक्शनची किंमत ३५,००० रुपये सांगीतले. 

सकाळी ० ९ :३० च्या सुमारास वडाळा बहिरोबा येथील नगर – औरंगाबाद रोड वर समाधान हॉटेल समोर असे सांगीतले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बनावट ग्राहक इंजेक्शन खरेदीसाठी पाठवून दोन पंचासह सापळा लावून दोन इसमांना मोटार सायकलसह ताब्यात घेतले.  त्यात रामहरी घोडेचोर (वय 22 देवसरी ता,नेवासा) आनंद धोटे (वय 28 रा भातकुडगाव ता शेवगाव) असे दोघांना पकडण्यात आले.

त्यांच्या अंगाची झडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन रेमडिसिव्ही इंजेक्शन व दोन मोबाईल, रोख रक्कम व हिरो स्प्लेंडर असा एकूण एक लाख 13 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.


ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन कोठून व कोणाकडून आणले आहे, याबाबत चौकशी केली असता, त्यांनी सदरचे इंजेक्शन हे पंकज खरड , (रा . देवटाकळी , ता . शेवगाव) याचेकडून घेतले असल्याचे सांगीतल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी देवटाकळी येथे जावून पंकज खरड यास ताब्यात घेतले.  त्याच्याजवळ ही एक इंजेक्शन एक मोबाईल असा एकूण 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्यानंतर त्याच्याकडे ही विचारणा केली असता त्यानेही सदरचे इंजेक्शन सागर हंडे (रा खरवंडी, ता नेवागण) यांचेकडून आणल्याचे सांगितले.खरवंडी येथून हंडेला ताब्यात घेतले असता तो भैरोबा गाव बस स्टँड समोर मिळून आला त्याच्याजवळ ही दोन रेमडिसिव्ही इंजेक्शन्स, एक मोबाईल, एक होंडा एक्टिवा गाडी असा एकूण 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. हंडेने देखील हे इंजेक्शन हेमंत राकेश मंडल (रा वडाळा,ता नेवासा) याने विक्रीसाठी दिले असल्याचे ताब्यात घेतल्यावर सांगितले.तसेच त्याचेकडे अजूनही इंजेक्शन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली.   

पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नेवासा फाटा येथे जावून आरोपी हेमंत मंडल याचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही . आरोपी हेमंत मंडल याची सियाज कार नं . एमएच – १२ – एनपी -७ ९ ११ ही राजमुद्रा चौक , नेवासा फाटा येथे उभी असलेली मिळून आली त्यात एक सिप्ला कंपनीचे रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच सियाज कार असा एकूण ९ , ५३,००० / -रु . किं . चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . 

आरोपी  मंडल याचा नेवासा फाटा परिसरात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.
 याप्रकरणी ४ आरोपींसह ११,७०,९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
  सदर बाबत अशोक तुकाराम राठोड , यांनी शनिशिंगणापूर पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनिशिंगणापूर पो.स्टे . करीत आहे.

 सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक मनोज पाटिल, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, सुदर्शन मुंढे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here