ऑक्सिजन लाईनच्या कामासाठी दीड लाखांचा धनादेश प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्त

नेवासा(प्रतिनिधी)


नेवासा ग्रामीण रुग्णालयासाठी मदर तेरेसा सेवाभावी संस्थेकडून दहा बेडच्या क्षमतेची ऑक्सिजन लाईन देण्यात आली आहे.या ऑक्सिजन लाईनसाठी लागणारा खर्च दीड लाखाचा असल्याने सदरच्या रकमेचा धनादेश नाशिक धर्मप्रांताचे प्रमुख बिशप डॉ.लुड्स डॅनियल यांच्या हस्ते प्रांताधिकारी गणेश पवार,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहसीन बागवान यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.


      नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला अगोदर ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन देण्याचे ठरले होते. सद्या ग्रामीण रुग्णालयात पन्नास बेडची  सुविधा आहे. त्यामध्ये चाळीस ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन
कॉन्सनट्रेटर मशीन देण्याऐवजी ऑक्सिजन लाईन देण्याचे ठरले या सेवेमुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे.


       नेवासाफाटा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोहसीन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पन्नास आरोग्य कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी येथे अहोरात्र सेवा देत आहेत. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या चांगल्या आरोग्यासाठी बिशप लुडस डॅनियल यांनी प्रार्थना केली.

नाशिक धर्म प्रांताचे प्रमुख बिशप डॉ.लुड्स डॅनियल यांनी हे रुग्णालय येणाऱ्या रुग्णासाठी तीर्थक्षेत्रासमान ठरेल येथे येणारा रुग्ण येथून बरा होऊन बाहेर पडेल असा शुभाशीर्वाद देऊन प्रार्थना केली.
    यावेळी ऑक्सिजन लाईन सेवेसाठी धनादेश प्रदान करतेवेळी नेवासा प्रेस क्लबचे संपर्कप्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण, अँड.राजेंद्र पंडित, मार्कस बोर्डे, शिक्षक संघटनेचे नेते भास्कर नरसाळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here