कोरोनावर ‘देशी दारुचा’ काढा ठरतोय उपयुक्त..

बोधेगाव सह परिसरात अनेक पेशंट बरे झाल्याची मिळतेय माहिती.

पोस्ट सोशल मेडीयावर व्हायरल 

मृत्यूदर कमी करण्यासाठी संशोधन होणे काळाची गरज…..…………………………

बोधेगाव : उद्धव देशमुख-        

  देशी दारु म्हटलं कि, डोळ्यासमोर दिसतात ते झुलानारे आणि धिंगाणा घालणारे लोकं, हि दारु सरकारने कशालाच बनवली असेल  याचा उपयोग तर नाही परंतु तोटेच जास्त प्रमाणात असल्याचे बोलले जाते. परंतु जीवनात  कधी कोणत्या गोष्टीला महत्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. कोरोना माहामारीने सध्या संगळ्यांचीच झोप उडुन दिली असताना सोशल मेडियातुन ‘देशी दारु’ ही योग्य प्रमाणात वापरल्यास कोरोनावर ती चांगल्या प्रकारे काम करते याचे पुराव्यानिशी उदाहरणे देउन ५० च्या वर कोरोना पेशंट बरे केल्याचे शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील सिताई हॉस्पिटलचे डॉ अरुण भिसे यांनी यात पुराव्यानिशी सांगितले आहे.   

 शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील काही गृपवर सध्या ‘देशी दारु’ कोरोनावर उपयुक्त ठरत असल्याचा मेसेज पहायला मिळत आहे. या व्हायरल मेसेज मध्ये डॉ. अरुण भिसे यांनी माहिती देताना सांगितले आहे कि, या अनुभवाचे सर्व श्रेय हे अंतरवाली येथील माझ्या  एका अडाणी पेशंटला व ‘अल्कोबॉट’ नावाचे साधे उपकरण बनवणारे डाॅ. आर के संघवी यांना  देतो.

गेल्या एप्रिल महिन्यात अंतरवाली येथील एका ६० वर्षीय महिला पेशंटला कोरोनाने ग्रासले तीचा स्कोर जास्त आणि परिस्थिती गंभिर असल्याने शेवगांव येथे तीला ॲडमिट करुन न घेता नगरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला परंतु बेड उपलब्ध न झाल्याने तीला घरी आणण्यात आले, सुरु असलेल्या औषधोपचाराचा काहीही परिणाम जाणवत नसल्याने तीच्यावर घरगुती काढे वाफ देण्यात आली तरीही बरे न वाटल्याने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून तीला ६० एम एल मात्रेत ‘देशी दारु’ देण्यात आली आणि आश्चर्य,  लागत असलेला दम कमी होउन तीला जेवण देखील गेले.

या अनुभवातुन डॉ भिसे यांनी मनवतेचा दृष्टीकोण समोर ठेवत आणि पेशंटचा जिव महत्वाचा असल्याने त्यांनी बेड न मिळालेल्या ५० कोरोना बाधितावर शासकीय तज्ञ समितीने ठरवून दिलेल्या गाईडलाईन नुसार उपचार सुरू केले  व सोबत  पेशंटला ३० एम एल ‘देशी दारू’ सकाळ/ संध्याकाळी  पाण्यासोबत पेशंटच्या समतीने दिल्याने ते कोरोनातुन मुक्त झाले आहेत. 


मी देशी दारु किंवा ईतर कोणत्याही दारुचे समर्थन करत नाही परंतु आजपर्यंत मी बेड न मिळालेल्या ५० कोरोना पेशंटला बरे केले आहे. आणि आजुन ही काही उपचार घेत आहेत. यामध्ये माझ्या अनुभवानुसार सत्यता आढळुन आली असुन मी पुराव्यानिशी ते सादरही करु शकतो. कोरोनाची दाहकता आणि मृत्यूदर कमी करण्यासाठीप्रशासन व संशोधन संस्था यांना विनंती आहे की याचा गांभीर्याने विचार करून यावर अधिकचे संशोधन करावे तथ्य आढळून आले तर संपूर्ण देशात याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावेत.” 
 ( डॉ. अरुण भिसे – सिताई हॉस्पिटल,बोधेगाव)


 *  काढा परिस्थितीनुसार द्यावा –    ” कोरोनावर १०० टक्के खात्रीशीर उपचार उपलब्ध नाहीत, स्टेरॉईड,रेमिडिसिव्हर,ऑक्सिजन, हेपारिन, मल्टीविटॅमिन या पाच औषधाच्या आधारेसर्व लढाई सुरू असली तरी पेशंटची शंभर टक्के  खात्री कुणी देत नाही. त्यामुळे आपल्याला  देशीचा  काढा महत्वाचा आहे.त्याचे प्रमाण ३० एम एल असुन तो फक्त ७  ते १० दिवस पेशंटच्या परिस्थितीनुसार द्यायवयाचा आहे. गरोदर माता  किंवा लिव्हर चा आजार असणाऱ्या  रूग्णाला  दारू देऊ नये त्यांना ‘अल्कोबॉट’ उपकरण वापरून फक्त दारूची वाफ देण्याचे नमुद करण्यात आले आहे.


* कोरोनाला निष्क्रिय करणारा फॉर्म्युला-    “अल्कोहोल व DRDO ने ज्या औषधाला कोरानासाठी मंजुरी दिली ते Deoxy D_Glocose यांच्या  केमिकल फाॅर्मुल्यातील साधर्म्य आश्चर्य चकित करणारे  आहे.तसेच कोरोना व्हायरस वरील लिपीड चे आवरण फक्त आणि फक्त अल्कोहोल किंवा साबनच निष्क्रिय करु शकते.


 * यात्रेवरुन आल्यानंतर मला श्वसनाचा त्रास जानवु लागला त्यामुळे माझी कोरोना टेस्ट करण्यात आली ती पॉझिटीव्ह आल्यानंतर मला डॉ भिसेंच्या मार्गदर्शनाखाली उपचारा बरोबर देशीचा काढा देण्यात आल्याने माझा १२ चा स्कोर कमी होउन आणि ९२ चा ऑक्सिजन प्रमाणात येउन मी सात दिवसात कोरोना मुक्त झालो उपचार घेतेवेळी माझे वय ५५ होते मला बी पी, शुगर-४०० असताना आज मी ठाणठनित बरा झालो आहे.      (कोरोनामुक्त प्रल्हाद गिरी- कांबी) 

 *  “माझा मुलगा बाहेर गावी असताना मला ताप दम लागणे आणि खोकला असा प्रकार त्यातच माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, ऑक्सिजन लेवल ८५आणि स्कोर १७ आल्याने बोधेगावात कुणीही माझ्यावर उपचार करायला तयार नव्हते परंतु  डॉ. भिसेनी मला ट्रिटमेंट मध्ये औषधी आणि देशी दारुचा काढा देउन माझे बंद झालेले जेवण दोनच दिवसात पूर्ववत झाले आणि सात दिवसात मी कोरोना मुक्त झालो.”   ( कोरोनामुक्त पेशंट-मोतीराम राठोड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here