‘ब्लॅक फंगस’ भयंकर आजार

रोटरी सेंट्रल मार्फत कोव्हीड रुग्णांकरीता म्युकॅारमायकोसिस सेमिनार : ईश्वर बोरा


नगर :

भारतात कोव्हीड -१९ ची दुसरी भीषण लहर सुरु आहे. त्यात  डॉक्टरां प्रमाणे कोव्हीड आजारातून बरे होणारे व बरे झालेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये “ब्लॅक फंगस” म्हणून ओळखला जाणारा दुर्मीळ पण धोकादायक बुरशीजन्य रोग म्युकॅारमायकोसिस संसर्गाची नोंद मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकूणच मृत्यूचे प्रमाण 50% असलेल्या म्युकॅारमायकोसिस रोग हा कोव्हीड मध्ये दिल्या जाणाऱ्या जीवनरक्षक उपचारातील स्टिरॉइड्स च्या वापर मुळे होत आहे असा डॉक्टरांचा विश्वास आहे.

कोव्हीड मधील फुफ्फुसातील जळजळ स्टिरॉइड्स मुळे कमी होते व कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी जेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती स्टिरॉइड्स मुळे अधिक क्रियाशिल होते तेव्हा कोरोना मुळे होणारे काही संभाव्य नुकसान थांबविण्यास मदत होते. परंतु त्याचवेळी रोग प्रतिकारशक्ती देखील स्टिरॉइड्स मुळे कमी होते आणि मधुमेह आणि मधुमेह नसलेल्या कोव्हीड मधील दोन्ही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते. डॉक्टरांच्या मते कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्ती मुळेच म्युकॅारमायकोसिस होण्याचा धोका रुग्णांमध्ये वाढतो.

बुरशीजन्य संक्रमणाने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये सामान्यत: चौंदलेलं व रक्तस्त्राव होणारी नाक, चेहऱ्याच्या एका बाजू ला असहाय वेदना होणे, डोकं दुखने डोळ्याच्या आसपास दुखणे व सूज येणे, तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातांमध्ये अचानक कोणते ही कारण नसताना वेदना होणे व दातातून पु येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, जबड्यामध्ये  इन्फेक्शन होणे व पू येणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे व नाकातून पाणी येणे तसेच डोळ्यातील सूज आणि वेदना; पापण्या कोरडे; आणि अस्पष्ट आणि शेवटी दृष्टी कमी होणे या पैकी एक किंवा अनेक लक्षणे असतात.  

म्युकॅारमायकोसिस चे निदान सिटीस्कॅन,  इंडॉस्कॉपी व बायोप्सी च्या साह्याने आपण लवकर करू शकतो. त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास त्वरित आपण दंत व डोळ्यांचे मुख्य आरोग्य विशेष तज्ञ्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. म्युकॅारमायकोसिस वर उपचार तातडीने केले तर आपण अश्या रुग्णांचे जीव वाचवू शकतो कारण हे आजार १० ते १५ दिवसात डोळ्या पर्यंत व मेंदू पर्यंत पोहोचतो, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. तातडीने निदान व उपचार करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे  (Antifungal therapy). 

पण संसर्ग शरीराच्या इतर अवयावा पर्यंत पोहोचला असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. उपचार करण्यास विलंब झाल्यास होणारी गुंतागुंत या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते, तसंच नाक आणि जबड्याच्या हाडावर दुष्परिणाम होतो आणि पंधरा दिवसात या संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यास पेशंटच्या मृत्यूची शक्यता ७०% असते असं सीडीसी च्या म्हणण्यानुसार आपल्याला कळलं आहे.

त्यामुळे  कोविड मधुन बरे झालेल्या रुग्णांनी आणि खास करून सोबत मधुमेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांमध्ये जागृती व्हावी याकरीता रोटरी क्लब ॲाफ अहमदनगर सेंट्रल ने अहमदनगर शहरातील प्रसिध्द दंत तज्ञ डॉ. श्री संजय असनानी यांचे ॲानलाईन सेमिनार चे  मोफत आयोजन झुम मिट व्दारे झुम मिटींग आय डी : ४१४ १५४ ५९६३ व पासकोड : १२१२१२१२ मार्फत शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व नगरकरांसाठी केले आहे. या शिबीराचे सर्व नगरकरांनी व मित्रपरिवाराने आपल्या आरोग्यच्या दृष्टीने न चुकता करून घ्यावा असे आव्हान रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले व  प्रेसिडेंट इलेक्ट ईश्वर अशोक बोरा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here