Public issue : पुरंदर तालुक्यात महावितरणचीपावसाळापूर्व कामे सुरू

बापू मुळीक

सासवड (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा विजेचे खांब, तसेच विद्युत वाहक तारांवर झाडाच्या फांद्या किंवा झाडेच कोसळून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात या पार्श्वभूमीवर सासवडसह पुरंदर महावितरणकडून पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली आहे.

पावसाळ्यात नागरिकाना विद्युत पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी दुरुस्तीची कामे आताच होणे आवश्यक आहे. भर पावसाळ्यात अशी कामे करताना विद्युत कर्मचान्यांना खूप त्रास होतो.. दुरुस्तीची कामे सुरु असल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
उमेश ससाणे, उपकार्यकारी अभियंता, सासवड विभाग

सासवडसह पुरंदर तालुक्यात विद्युत विभागाने दुरुस्तीच्या कामांची मोहीम हाती घेतली असून नादुरुस्त असलेली, तसेच अर्धवट असलेली सर्व कामे केली जात आहेत. पावसाळ्याला महिना राहिला असून पावसाळ्यात ही कामे करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन पोल उभे करणे, शेतकऱ्यांच्या विहिरीवर नवीन विद्युत कनेक्शन जोडणे, गावाच्या मुख्य लाईन वरील दुरुस्त्या करणे, मुख्य डीपीची दुरुस्ती, ज्या ठिकाणचे जंप तुटले असतील ते बसविणे, तुटलेल्या विद्युत तारा जोडणे, नवीन लाईन ओढणे ही कामे केली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here