Public issue: पत्रकारांच्या प्रश्नावर भाजप गप्प का? :एस.एम.देशमुख


निलेश भुजबळ

जेजुरी: राष्ट्र सह्याद्री महाराष्ट्र सरकार पत्रकारांना "फ़न्टलाईन वॉरियर्स" म्हणून घोषित करीत नसल्याबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष असला तरी विरोधी पक्ष असलेला भाजप मात्र या सर्व घटनांकडे तटस्थ भूमिकेतून बघत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

देशातील अन्य नऊ राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील पत्रकारांना देखील फ़न्टलाईन वॉरियर्स म्हणून जाहीर करावे अशी पत्रकारांची मागणी आहे.

या मागणीच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षातील बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, श्रीकांत शिंदे, निलमताई गोऱ्हे, कपिल पाटील यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिली आणि ती सोशल मिडियावर व्हायरल केली.

खरं म्हणजे हे सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या एवढे जवळचे आहेत की, पत्र लिहिण्याऐवजी सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दबाव आणला तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल तसे होत नाही.

सत्ताधारी नेते आपल्याच मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहितात हे अपवादात्मक चित्र महाराष्ट्रात दिसते आहे.

अनेक महत्वाच्या विषयावर सतताधारयांच्या बंद दाराआड चर्चा होतात आणि निर्णय घेतले जातात.
मग पत्रकारांच्या प्रश्नांबाबतच हे गुऱ्हाळ का? की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखे करतो अश्यातला तर हा प्रकार नाही ना? असा सवाल पत्रकार उपस्थित करीत आहेत.

अर्थात सत्ताधारी नेत्यांना धन्यवाद यासाठी की ते किमान पत्रं तरी देत आहेत विरोधक मात्र ते ही करीत नाहीत.
ते गप्प आहेत.
सरकारची अडवणूक करण्यासाठी कायम विषयाच्या शोधात असलेल्या विरोधकांना पत्रकारांचे प्रश्‍न सरकारची कोंडी करण्याच्या योग्यतेचे वाटत नाहीत याचे आश्चर्य वाटते.वसतु:केंद़ सरकार असेल किंवा भाजपची सत्ता असलेल्या युपी सारखी काही राज्ये असतील तेथे सरकारने निर्णय घेतलेले आहेत.

केंद्राने मयत पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
“आमची सरकारं पत्रकारांची काळजी करतात मग तुम्ही पत्रकारांकडे का दुर्लक्ष करताय? असा सवाल करीत भाजप राज्यात रान उठवू शकले असते मात्र भाजप पत्रकारांच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाही.

ठाकरे सरकारवर पत्रकार नाराज होणार असतील आणि सरकार परस्पर बदनाम होणार असेल तर होऊ द्या असा तर भाजपचा दृष्टीकोन नाही ना? असा सवाल एस.एम.देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात राज्यातील पत्रकारांची मात्र ससेहोलपट होत असल्याचा आरोप देखील एस.एम.देशमुख यांनी केला आहे..

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना विशेष धन्यवाद द्यावे लागतील.
त्यांनी कोविड बाधित पत्रकारांसाठी जिल्हा परिषदेच्या हिंजवडी
(विप्रो फेस 2 ता. मुळशी) येथील कोविड सेंटरमध्ये उपचाराची विशेष व्यवस्था केलेली आहे.
8 मे रोजी त्यांनी या संबंधीचे परिपत्रक काढले असून रूग्णांनी 8956704750 या क़मांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एस.एम.देशमुख यांनी
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here