Ariculture : बारामतीत राज्यातील 900 गायींचा सर्वात मोठा गोठा!

बारामती जिल्ह्यात अभिजीत यांचा सावंत डेअरी फार्म

Dairy Farm

पुणे : राज्यातील सर्वात मोठ्या गाईच्या गोठ्याविषयी माहिती घेणार आहोत. बारामती मतदारसंघातील वाकी या गावातील तरुण शेतकरी ज्यांनी साधारणतः ९०० गायींचा गोठा उभारला आहे, त्यांचा जीवन प्रवास यानिमित्ताने आपण बघणार आहोत. ते म्हणजे अभिजीत सावंत. ते गायींना कोणते खाद्य दितात, त्यांची काळजी कशी घेतात, याची माहिती घेणार आहोत. (The largest herd of 900 cows in the state! Abhijeet’s Sawant Dairy Farm in Baramati).

सावंत यांच्याकडे जर्सी आणि हेल्सविन फ्रिजन (Jersey cow and Holstin frigen Cow) या जातीच्या गायी आहेत. या गायींची दूध देण्याची क्षमता ही साधारणतः २० लिटर आहे. या दुधाला प्रती लिटर ३०-३५ रुपये भाव मिळतो. अभिजित यांनी सावंत डेअरी फार्म (Sawant Dairy Farm) या नावाने २००३ मध्ये आपली डेअरी सुरू केली आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे ३० गायी होत्या. त्यांची संख्या वाढून आज ८५० गायी आणि ५० बछडे झाली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण मुक्त गोठा गायींची काळजी

  • गायीसाठी सावंत यांनी प्रशस्त मुक्तगोठा उभारला आहे. त्यांना खाद्य (Cow feed) म्हणून ते मेथीचा पाला आणि सुका चारा देतात. दिवसभरात या गायींना जवळपास सोळा टन चारा लागतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गायींना चारा दिला जातो. त्यांचा गोठा पूर्णपणे यंत्रिक आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने सुसज्ज आहे. (The cow shed is fully equipped with mechanical and technological means) दूध काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे स्टेज बनवले आहे. गायी दूध काढण्यासाठी आणल्यावर त्यांची व्यवस्थित साफसफाई होते आणि नंतर त्यांना दूध काढण्यासाठी यंत्र आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या गोठ्यात आणले जाते. त्यांची कासही व्यवस्थित साफ करून निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे दुधाची गुणवत्ता उत्तम राहते. 

५०० लिटर क्षमतेचे दोन दूध कूलर

  • गोठ्यामध्ये ४० बाय ४० लिटर क्षमतेच्या टाक्या बनवलेल्या आहेत. त्या भरल्या की मोटार चालू होऊन त्यातील दूध हे पुढे फ्रिजमध्ये जाते. गायींचे दूध देखील यंत्राच्या साह्याने काढले जाते. दूध काढून झाल्यावर गायी त्यांच्या मुक्त गोठ्याकडे निघून जातात. त्यांना देखील स्वयंशिस्त लागली आहे. अभिजित सांगतात की, ५०० लिटर क्षमतेचे दोन दूध कूलर बसवले आहेत. दूध निघाल्यानंतर पाइपलाइन मार्फत ते इथपर्यंत येऊन यात जमा होते. कुठल्याही प्रकारच्या बाहेरील वातावरणाच्या संपर्कात हे दूध येत नाही. त्यामुळे अतिशय शुद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचे दूध मिळते.

सावंत डेअरी फार्मचा ब्रँड

सावंत यांनी फार्मपुरते मर्यादित न राहता त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगही (Milk processing unit) उभारला आहे. त्यांनी सावंत डेअरी फार्ममध्ये स्वतःचे उत्पादन निर्मिती केली आहे. स्वतःचा ब्रँड विकसित तयार केला आहे. दूध कढवून या पॅकेजिंग युनिटमध्ये आणल्यावर ते विशिष्ट प्रकारच्या काचेच्या बॉटलमध्ये पॅक केले जाते. हे करत असताना त्याची स्वच्छता राखणे खूप गरजेचे असल्याने सर्व काम यंत्रांमार्फत केले जाते. 

अभिजित सांगतात, ‘माझ्याकडे एकूण लहान मोठ्या ९०० गायी आहेत. त्यातील ३०० गायी दूध देतात, तर बाकी काही कालावधीनंतर दूध देण्यास सुरुवात करतील आणि काही लहान आहेत. माझ्याकडे एकूण सात हजार लिटर प्रतिदिन दूध उत्पादन होते.

अशी करा दुग्ध व्यवसायाची सुरुवात

दुग्ध व्यवसाय (How to start Dairy Farming Business) सुरू करताना सुरवातीला कमीत कमी गायींपासून केली पाहिजे कारण यात काय उणिवा आहेत, या व्यवसायातील बारकावे काय आहेत, हे समजून घेणे सोपे जाते आणि त्यातून आपण शिकत जातो, असे सांगत अभिजित म्हणतात की, सुरवातीला मी बंदिस्त गोठा उभारला होता. मात्र यामध्ये गायी जास्त प्रमाणत आजारी पडत होत्या आणि मजुरांची देखील अडचण येत होते.

देखभालीसाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे मी मुक्त गोठा उभारला. त्यानंतर गायींच्या आरोग्यात सुधारणा तर झालीच, शिवाय कामगार देखील कमी लागू लागले. खर्चही आपोआप कमी झाला (Cost of dairy business). मी साधारणतः ३० गायींपांसून सुरुवात केली. त्यातील सर्व व्यवस्थापन (Dairy farming management) मी शिकत गेलो आणि मग हळूहळू व्यवसाय वाढवला. 

मुक्त गोठ्याचे फायदे

मुक्त गोठा उभारल्याने कष्ट कमी होतात आणि गायींना हवे तसे त्या वावरू शकतात. त्यांना आवश्यक आहे तेव्हा पाणी पिणे, चारा खाणे तसेच उन्हात बसणे या सर्व गोष्टींमुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्याचा फायदा आपल्याला दुधाच्या उत्पन्न वाढीसाठी होतो. गायींचे दूध हे यंत्रांमार्फत काढल्याने गायींना काही त्रास होत नाही आणि शिवाय गायींचे वासरू जसे दूध पिते त्यासारखीच या मशीनची रचना केली आहे.

दर्जेदार गायींमुळे दुग्धोत्पादन चांगले

माझ्याकडे ज्या प्रजातीच्या गायी आहेत त्यांची दूध देण्याची क्षमताही  उत्तम आहे. या गायींची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यांच्या दुधात उत्तम फॅट असते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी या गायी पंजाब आणि बंगळुरू येथून आणल्या आहेत. तसेच काही आपल्या स्थानिक बाजारातून देखील घेतल्या आहेत. गायींना बुरशीयुक्त खाद्य देऊ नये, त्यामुळे गायींच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, मात्र आपल्या देखील खाण्यात ते दूध आल्यानंतर आपल्याही आरोग्यावर परिणाम होतो.  गायींचा मोठा गोठा जर उभारायचा असेल तर त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच चाऱ्याचे नियोजन देखील करणे तितकेच गरजेचे आहे. दिवसभर आपण कशाप्रकारे गायींची काळजी घेणार, त्यांना कोणकोणते खाद्य देणार, त्याचे प्रमाण किती ठेवायचे या सर्व गोष्टींवर काळजीपूर्वक लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. वेळोवेळी त्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.

व्यवसायाचे मार्केटिंग कसे करणार?

सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केटिंग (Dairy Farming Marketing) करता येईल का, हे पाहणे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर दुग्ध व्यवसायाला सुरुवात करणार असूत तर प्रक्रिया उद्योग उभारून आपण स्वतचा ब्रँड तयार करून ते मार्केटमध्ये विकू शकतो का, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला ते शेतकरी मित्रांना देतात.

ईओअभिजित सांगतात की, त्यांना पॅकिंग करून प्रती लिटर ८० रुपये दर मिळतो. मात्र, सर्व खर्च वजा करता त्यांना ३५ रुपये इतका प्रती लिटर सरासरी दर मिळतो.  दहा गायींसाठी सरकारी अनुदान आहे. मात्र जास्तीत जास्त गायी आपल्याला पालन करायच्या असतील तर त्यासाठी बँकेतून कर्ज घ्यावे लागते. आपण घरच्या गोठ्यात गायी जतन करून देखील गायी वाढवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here