Health : खिर्डीमध्ये कोविड19 लसीकरण सुरू

पहिल्या दिवशी खिर्डी-गुजरवाडी गावातील 40 ग्रामस्थांनी घेतली लस

श्रीरामपूर : टाकळीभान येथील अयोग्य केंद्रावर गर्दी आणि वशिलेबाजीमुळे खिर्डी परिसरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, खिर्डीतील आरोग्य उपकेंद्राच्या पुढाकारातुन शुक्रवारी (दि.१४) अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खिर्डी गावातचं लस मोहिमेला प्रारंभ करण्यात आली. पहिल्याचं दिवशी खिर्डी-गुजरवाडी परिसरातील ४० ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. या लसीकरणादरम्यान एक महिला कोरोना पिझिटिव्ह आढळून आली.

टाकळीभान येथील लसीकरण केंद्रावरील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर खिर्डीमधील लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी खिर्डी आणि गुजरवाडी ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर व कर्मचारी आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते गेल्या दोन दिवसापासून नियोजन करीत होते. योग्य नियोजनामुळे कुठलाही गोंधळ न होता आणि विना अडथळा आज लसीकरण मोहीम पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे, डॉ. मृणाल सुरवसे व डॉ. सोनाली राऊत यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या लसीकरण मोहिमेसाठी सुनील काकडे आणि राहुल शिंदे या वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. याचबरोबर भीमाबाई कांबळे, सुनीता बनसोडे व शारदा गुजर या आशा स्वयंसेविकांनी स्थानिक पातळीवर आपली जबाबदारी चोखपणे बजावली. खिर्डी गावचे उपसरपंच भाऊसाहेब जाधव, पोलीस पाटील दिलीप हळनोर आणि सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे, विजय पिसे, आप्पासाहेब माकोणे यांनी लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी जातीने लक्ष घातले. लसीकरणाचा पुढील दिवस कोणता असेल, हे आरोग्य उपकेंद्राकडून सांगितल्यानंतर ग्रामस्थांना कळविले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here