Health : संतोष तानाजी वाळके गरजूंना मदतीचा हात देणारा कार्यकर्ता…

दिघी येथे शिवसेनेच्या वतीने तीन हजार नागरीकांना मोफत धान्य वाटप

दिघी ( अर्जुन मेदनकर) : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये दिघी शिवसेना विभाग प्रमुख संतोष वाळके यांनी सुरु केलेला अन्नदानाचा उपक्रम अनेक नागरिकांना उपयोगी आहे. संतोष वाळके नेहमीच गरजूंना मदतीचा हात देणारा कार्यकर्ता आहे, असे गौरवोद्गार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिघी शिवसेना विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी शनिवार पासून मोफत धान्यदानयज्ञ सुरु केला आहे. कै. तानाजी सोपानराव वाळके, कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना दिघी विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे उद्‌घाटन शनिवारी खासदर श्रीरंग बारणे यांनी ऑनलाईन पध्दतीने केले. यावेळी दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख संतोष वाळके, कृष्णकांत वाळके, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर वाळके, संतोष जाधव, माजी सैनिक महासंघाचे अध्यक्ष अशोक काशिद तसेच संदिप वाळके, नवनाथ परांडे, प्रशांत निंबाळकर, कामगार नेते हनुमंत खराबी, रमेश जाधव, दिघी गाव करोना मुक्त समितीचे कार्यकर्ते सोपानराव वाळके, लक्ष्मण सुपे, विश्वनाथ टेमघिरे, सागर रहाणे, भाऊसाहेब काटे, बापू परांडे, नितीन परांडे, सुरज वाळके, दिवेश सकपाळ, सुमित येडगे, शुभम चौधरी, गौरव आसरे तसेच संतोष तानाजी वाळके आणि मित्र परिवार आदी उपस्थित होते.


खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, मागील वर्षी तीस हजारांहून जास्त नागरीकांना अन्नदान केले होते. गटई कामगार, केश कर्तनालयातील कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक यांना मोफत किराणा मालाचे किट दिले. बाहेर गावी जाण्यासाठी विद्यार्थी व कामगारांना मदत केली. यावर्षी दिघी परिसरातील होम क्वॉरंटाईन असणा-या रुग्णांना मोफत दोन वेळ जेवणाचे डबे घरपोच देण्यात येत आहेत. तसेच तीन हजार गरीब कुटूंबांना मोफत किराणा किट देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तीन किलो तांदूळ, तीन किलो गहू, आणि साखर, तुरडाळ, गोडेतेल आणि मीठ प्रत्येकी एक किलो देण्यात येत आहे. तसेच प्लाझ्मा दान करणा-या व्यक्तींना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षिस देत आहेत. या उपक्रमामध्ये पंचवीस दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे.

मागील महिन्यात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या वाळके कुटूंबियातील संतोष तानाजी वाळके हा गरजूंच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे, असेही खा. बारणे म्हणाले.त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.यातून इतरांनी प्रेरणा घेवून आरोग्यसेवा,गोरगरिबांना मदत करण्याचे आवाहन केले.

2 COMMENTS

  1. A large percentage of of what you state happens to be astonishingly appropriate and it makes me ponder the reason why I hadn’t looked at this with this light before. This particular article truly did turn the light on for me personally as far as this particular subject goes. But at this time there is one particular issue I am not really too comfy with so whilst I try to reconcile that with the actual central theme of your position, permit me observe what the rest of the subscribers have to say.Very well done.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here