रस्त्यावर रॅपिड अँटीजन टेस्ट; नेवासा पोलिसांची धडक कारवाई

पोलीस निरीक्षक करे रस्त्यावर उतरून करत आहेत रॅपिड टेस्ट

नेवासा फाटा ( प्रतिनिधी) 


नेवासा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे हे रस्त्यावर उतरले असून विनाकारण रस्त्यावर  फिरणार्‍यांची ते रॅपिड अँटीजन टेस्ट करत आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्यात विनाकारण फिरण्याची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे.  बीन कामाचे लोक रस्त्यावर फिरत असतांना त्यांना पकडून त्यांची तत्काळ रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात येत आहे तसेच जे ह्या रॅपिड टेस्ट मध्ये कोविड पॉझिटिव्ह सापडले. त्यांना तात्काळ शासकीय वाहनाने कोविड  सेंटरला पाठविण्यात येत आहे. तसेच जे या टेस्टमध्ये निगेटिव्ह आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. 

आज पासून संपूर्ण नेवासा तालुक्यात भेंडा, प्रवरा संगम, नेवासा फाटा, कुकाणा, नेवासा शहर या प्रत्येक ठिकाणी पोलीस  आरोग्य विभागाला सोबत घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची रॅपिड अॅटीजन टेस्ट करत आहोत. तरी मी नागरिकांना विनंती करतो की, अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर रस्त्यावर फिरू नये, जर असं कोणी दिसले तर त्यांना पकडून त्यांचे रॅपिड अंटीजन टेस्ट करून, जर ह्या टेस्ट मध्ये ते पॉझिटिव्ह आढळले तर शासकीय वाहनात बसून त्यांना कोविड सेंटरला रवाना केले जाईल.  

विजय करे, पोलीस निरीक्षक

2 COMMENTS

  1. Pretty nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I have truly enjoyed browsing your blog posts. After all I will be subscribing to your feed and I hope you write again soon!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here