Interview: बावधनच्या दिलीप वेडे पाटीला यांची  विकास कामात भरारी

पुणे : कोथरूड- बावधन भागातील नगरसेवक दिलीप वेडे पाटील म्हणजेच बावधानचे दिलीप अण्णा, यांच्या करोनाच्या काळात कार्याचा आढावा लक्ष्यात घेता पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या संजय वाघमारेने घेतलेली मुलाखत.

संजय वाघमारे : नगरसेवक म्हणून ही तुमची पहिली वेळ आहे का ….?

दिलीप पाटील (नगरसेवक) : हो, पहिलीच

संजय (प्रतिनिधी)  : आता करोनाच्या काळात बाहेर जनतेमध्ये वावरताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करता? किंवा काय काळजी घेता?

दिलीप पाटील (नगरसेवक) : मी माझी तर काळजी घेतोच, जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि वेळोवेळी सॅनिटायझेशन करणे इत्यादी.पण तसेच जनतेला पण तसे करण्याचे वारंवार सांगत असतो.

संजय पुणे (प्रतिनिधी)  : काळाची गरजच खरतर!
आता आपल्या वार्डात काय परिस्थिती आहे?

दिलीप पाटील (नगरसेवक) : परिस्थिती वाईट नाहीये, तरीपण आम्ही काळजी घेतो की करोणा वाढू नये.आणि आता परिस्थिती ठीक आहे जास्त नाही आणि कमी पण नाही , साधारणता आटोक्यात आहे म्हणता येईल,आणि हळू हळु सुधारत आहे.

संजय पुणे (प्रतिनिधी)  : आपल्या वर्डामधे किती लस केंद्रे आहेत आणि ती कुठे कुठे आहेत?

दिलीप पाटील (नगरसेवक) : माझ्या वार्डात २ लस केंद्रे आहेत एक म्हणजे उजवी भुसारी (सावरकर हॉल) आणि दुसरा  बावधानला जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र .

संजय पुणे (प्रतिनिधी)  : जेष्ठ नागरिकांना लस देताना काय जबाबदारी घेतली ?

दिलीप पाटील (नगरसेवक) : जेष्ठ नागरिकांना लस देताना महत्वाचं सांगायचं म्हटल तर माझी एक स्वतःचं वाहन आहे “लोकरथ” म्हणून, त्या वाहनांमध्ये त्यांना लस केंद्रापर्यंत नेण्यापासून ते घरी सोडण्याचं  काम पूर्णतः मोफत केलं गेलं आणि करतो आहोत.

संजय पुणे (प्रतिनिधी)  :आपण आता पाहत आहोत की लसीचा तुटवडा जाणवत आहे! मग आपल्या केंद्रावर दररोज किती डोस दिले जात आहेत.

दिलीप पाटील (नगरसेवक) : हो खर आहे. तस् पाहता सद्या लसीची कमतरता आहेच,आणि आपल्याकडे दिवसाला १०० किंवा १५० असे दिले जातय ते पण किती साठा आहे यावर अवलंबून अस्त.

संजय पुणे (प्रतिनिधी)  : खूपच छान! एक नगरसेवक म्हणून तुमच्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत?, आणि त्या तुम्ही कश्या पार पाडता? जे तुम्हाला सरकार दरवेळी सांगत?

दिलीप पाटील (नगरसेवक) : एक तर प्रभागातील नागरिकांनी आम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं असतं,मग यात त्यांच्या काय काय समस्या असतात ते सोडवण जसं की पाणी पुरवठा,वीज, इत्याद.आणि काही जणांच्या वयक्तिक समस्या पण सोडवण्याचा प्रयत्न करतो.तसेच या प्रभागात महापालिकेच्या वतीने जे जे प्रोजेक्ट नाही झाले ते या प्रभागात आणणे, साधारणतः माझ्या प्रभागामध्ये ह्या पंचपर्शिक योजनेच्यामाध्यमातून छोटी मोठी ६ गार्डन तयार केले आहेत,रस्ते दुरुस्ती ,तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारली आहेत. त्याचप्रमाणे होतकरू विद्यार्थ्यासाठी एम पी /युपी येस सी अभ्यासिका वर्गपण बांधला आहे,महिला वर्गासाठी त्यांचि काही बचत व्हावी म्हणून महिला बचत गट तयार केली आहेत.

संजय पुणे (प्रतिनिधी)  :  नगरसेवक म्हणून नागरिक तुमच्याकडे काय मागण्या मागतात आणि तुम्ही त्या कश्या पुरवता.

दिलीप पाटील (नगरसेवक) : नगरसेवक म्हणून लोकांना सारखं त्यांच्या संपर्कात राहाव आणि त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवाव्यात असं त्यांचं म्हणणं असत त्याच अनुषंगाने माझा मोबाईल २४ तास चालू असतो आणि मी तसं लोकपर्यंत पोहचतो पण आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतो.
आणि कुटल्या ही त्यांच्या अडचणींना मदत व्हावी असं पाहतो.

संजय पुणे (प्रतिनिधी)  :  आता करोणा च्या काळात घरच्यांना आणि जनतेला कसा वेळ देता?

दिलीप पाटील (नगरसेवक) : सद्या तरी घरच्यांसोबत खूपच कमी वेळ घालवतोय कारण लोकांचे वारंवार फोन असतात,सकाळी बाहेर फिरायला गेलो तरी नागरिकांसोबत गप्पा मारणे आणि त्यांच्या समस्या समजावून घेणं,त्यानंतर दररोज महापालिकेत जातो तेव्हाच महापालिका समजते अन्यथा नाही,आणि प्रभागासाठी काही निधी भेटतो का हेच पाहण्याच काम दिवसभर चालू असत, स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय असताना आणि शेती असताना ही त्यासाठी थोडा पण न वेळ देता ती सगळी कामे घरच्या लोकांना देऊन मी फक्त आणि फक्त जनतेची कामे करतो.

संजय पुणे (प्रतिनिधी) : नगरपालिकेेमधे ज्या मीटिंग होतात त्या मध्ये तुम्ही काही प्रश्न मांडले आहेत का?

दिलीप पाटील (नगरसेवक) : आधी मेट्रोचा जो वणाज ते रामवाडी पर्यंत चा प्रोजेक्ट होता, तो चांदणी चौक ते रामवाडी होण्याचा प्रस्ताव मी मांडला होता आणि आता त्याला मान्यता पण मिळाली आहे आणि ते दुसऱ्या टप्यात पूर्ण होईल.आणि दुसर म्हणजे माझ्या वार्डात कचरा डेपो होता तो हटवण्यासाठी काम केले आणि मेट्रो साठी तिथे स्टेशन व्हावं याचा प्रयत्न करून २८ एकर जागा मिळाली सुद्धा.

संजय पुणे (प्रतिनिधी)  तुम्ही आता तुमच्या वर्डामधे काय करू इच्छिता? म्हणजे तुमच्या वर्डामधे नवीन काय करायचं?

दिलीप पाटील (नगरसेवक) : सद्याची स्थीती लक्ष्यात घेऊन आणि ऑफ लाईन शाळेचा प्रश्न समोर ठेऊन लहान मुलासाठी ईलर्निग स्कुलसाठी मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करत आहे,तसेच महिलांना कॉम्प्युटर चे शिक्षण देण्याचे ही काम चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here