करोना विषाणू मानवनिर्मितच!

चीनच्या वुहान लॅबमध्ये निर्मिती; वैज्ञानिकांना मिळाले पुरावे

लंडन:


करोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतल्यानंतर आता करोना विषाणूची निर्मिती कशी झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात ब्रिटनचे प्रोफेसर अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर यांनी करोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच झाली असल्याचा दावा केला.


यासाठी त्यांनी करोना विषाणूचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाल्याचा दावा त्यांनी आपल्या अहवालात केला आहे. करोना विषाणू तयार केल्यानंतर आपलं काळं कृत्य लपवण्यासाठी चीननं रेट्रो इंजिनियरिंगचा वापर केला. तसेच हा विषाणू मानवनिर्मित नसून वटवाघुळातून पसरल्याचं भासवलं. मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय विषाणू तयार होऊच शकत नाही असा दावा त्यांनी केला. चीनकडे यापूर्वीही अनेकदा संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं आहे.

करोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णत: मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ‘गेन ऑफ फंक्शन’ या प्रकल्पात याची निर्मिती केली गेली आहे. चीनने गुहेतील वटवाघुळामधून करोनाचा बॅकबोन घेतले आणि त्यावर स्पाईक टाकत त्या विषाणूला अधिक घातक केलं. त्यामुळे त्या विषाणूत मानवी हस्तक्षेप असल्याचे काही गुणधर्म आढळून आले असल्याने तो लॅबमध्येच तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. करोना व्हॅक्सिन निर्मितीसाठी अभ्यास करताना हा खुलासा झाला. याबाबतचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे.

वुहान लॅबमधील माहिती जाणीवपूर्वक लपवली गेली आणि नंतर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ज्या शास्त्रज्ञांनी यावर आवाज उचलला त्यांना एकतर गप्प केलं गेलं किंवा त्यांना गायब केलं. संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करायचे तेव्हा अनेक वैज्ञानिक जर्नलने नकार दिला. त्यामुळे चीनचं पितळ उघडं पडलं नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमनं जानेवारी महिन्यात वुहानचा दौरा केला होता. तेव्हा त्या टीमने करोनाची निर्मिती नैसर्गिकरित्या झाल्याचा दावा केला होता.

3 COMMENTS

  1. of course like your web site however you have to check the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling issues and I find it very bothersome to inform the reality nevertheless I will surely come back again.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here