समता शिक्षण प्रसारक मंडळ उपोषणावर….

खरवंडी येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाला
शिक्षणाधिका-याचा जाच

संस्था पदाधिका-यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

नगर :  

खरवंडी (ता.नेवासा) येथील मान्यताप्राप्त समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक कामकाजात जिल्हा परिषद व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक अडसर करत असुन नियमबाह्य अडचणी आणत आहेत. त्यामुळे  पवित्र असलेली शिक्षणाची ज्ञानगंगा बंद पडण्याचा धोका वाढला आहे.

या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षकांनी नगरमध्ये जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. यात संस्था अध्यक्ष गोरक्षनाथ कुर्हे, सचिव जयवंत लिपाणे, उपाध्यक्ष आबासाहेब फाटके, भरत फाटके, सुभाष शिंदे, बन्सीभाऊ म्हस्के, मंदाकिनी म्हस्के, सुनिता लिपाणे, रमेश घुले, सुरेखा चिंधे, विक्रम म्हस्के आदी सहभागी झाले होते.


    समता शिक्षण प्रसारक मंडळाचे २ अनुदानित तर एक अंशत: अनुदानित विद्यालय कार्यरत आहेत.
या तीन विद्यालयात दीड हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या गुरुवर्य भास्करगिरी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळके खुर्द ता.नेवासा येथील मुख्याध्यापकास सन २०१९ पासून विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापक ऐवजी सहशिक्षक म्हणून काम पाहण्याचा आदेश दिला होता.१ जून २०१८ पासून संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष केशव थोरात यांनी कायद्याचे उल्लंघन करून पात्र अहर्ता नसलेल्या ए.टी.डी.ए.एम सेवाकनिष्ठ शिक्षक नामदेव  ससे यांना नेमणूक दिली. या प्रभारी पदास शिक्षणाधिका-यांनीही मान्यता दिली. यामुळे सेवाजेष्ठ शिक्षकावर अन्याय झाला.

    गैरमार्गाने कायद्याचे उल्लंघन करून तत्कालीन शिक्षणाधिका-यांनी २८ मे २०२० रोजी ससे यांना नियमित मुख्याध्यापकाची मान्यता दिली. याच दरम्यान समता शिक्षण मंडळाची धर्मादाय उपआयुक्त अहमदनगर यांच्या आदेशानुसार धर्मादाय निरिक्षक यांचे उपस्थितीत कायदेशीर नियमानुसार लोकशाही मार्गाने २५ जानेवारी २०२० रोजी निवड प्रक्रिया होवून सन २०१९ ते २१ या कालावधीसाठी नवीन विश्वस्तांची अधिकृतपणे निवड झाली.अध्यक्ष म्हणून गोरक्षनाथ कु-हे तर सचिव म्हणून जयवंत लिपाने यांची निवड झाली होती.

   संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल पिंपळवाडी ता.कर्जत या विद्यालयातील सेवाज्येष्ठ शिक्षक रमेश घुले यांनी सेवाजेष्ठ व पदोन्नती हक्कासाठी वेळोवेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांचेकडे तक्रार अर्ज केले.शिक्षण उपसंचालक यांनी नगरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना या प्रकरणी चौकशी करण्याची सुचना केली. घुले हेच सेवाजेष्ठ  शिक्षक असल्याचा अहवाल शिक्षण उपसंचालकास देण्यात आला.घुले यांच्या तक्रार अर्जानुसार ससे यांची मुख्याध्यापक पदाची १ जून २०१९ पासून दिलेली मान्यता शिक्षण उपसंचालकांनी रद्द करुन त्यांना सहशिक्षक म्हणून काम पाहण्याचे सांगितले.

     काही व्यक्तींच्या दबावापोटी अधिकृत संस्थेच्या कोणत्याही प्रभारी मुख्याध्यापक मान्यता प्रस्तावास उत्तर न देता महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती कायदा १९७७नियमावली १९८१ नियम १२ अनुसुची फ मधील मार्गदर्शक तरतूदी नुसार सेवाकनिष्ठ शिक्षकास मुख्याध्यापक  करणे बेकायदेशीर आहे. वरील बाबीची चौकशी संस्था हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, समता शिक्षण प्रसारक मंडळाने उपस्थित केलेल्या प्रश्नास बी.एड नियुक्त माध्यमिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदुराव जाधव व संघटनेच्या पदाधिका-यांनी पाठिंबा दिला आहे.

1 COMMENT

  1. whoah this blog is fantastic i really like studying your posts. Keep up the good paintings! You already know, lots of persons are searching around for this information, you can aid them greatly.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here