एक नव्हे तर दोन खुनाचा मास्टरमाईंड ज्ञानेश्वर गायकवाड 


शिरुरकासार


शिरूर येथील सोनाराच्या खुनातील मास्टरमाईंड ज्ञानेश्वर गायकवाड हा एक नव्हे तर दोन खुनातील मास्टरमाईंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या गायकवाडला मंगळवारी (दि१) पहाटेच्या सुमारास नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. ही कारवाई नाशिक पोलिसांच्या मदतीने ‌स्थनिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांनी केली.

मागिल आठवड्यात शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथेचे गायकवाडने मित्राच्या मदतीने अपहरण करून सोन्यासाठी त्याचा खुन केला. या प्रकरणात ‌धीरज माडकर व केतन लोमटे याची नावे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. 

मात्र मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड हा फरार होता. दरम्यान दोन्ही आरोपींना शिरूर न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तेव्हापासून भैय्या गायकवाड हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तैनात करण्यात आले होते. अखेर मंगळवारी एक जुनं रोजी पहाटे ज्ञानेश्वर उफऺ भैय्या गायकवाड यास नाशिक येथून जेरबंद करण्यात आले. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली यावेळी त्याने आणखी एका महिलेचा खून ‌केल्याची कबुली दिली. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता ७ जुनपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


काय आहे राहुरी येथील खुन प्रकरण


राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर ते मनमाड रोडवर १५ मार्च २०२१ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला. सदरील महिलेच्या डोक्यात दगड घालून क्रुरपणे हत्या करण्यात आली होती.  पुरावा नष्ट करण्याचा हेतुने चेहऱ्याचा भाग छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांना मयताची ओळख पटली नाही. याप्रकरणी अज्ञान विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नाशिक येथून भैय्या गायकवाड यास अटक केल्यानंतर पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी त्याची चौकशी केली असता त्याचे दोन लग्न झाले असल्याची त्याना महिती होती. त्यावरून राऊत यांनी पत्नीसंदर्भात विचारणा केली. याबद्दल सांगताना भैय्या गायकवाड वर संशय निर्माण झाला त्यास पोलिसी खाक्या दाखवतात केतन लोमटे या मिञाच्या मदतीने शितल भाबरे (या नाशिक) हिचा राहुरी येथे डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली.


सोने चांदी केली जप्त


शिरूर येथील सोनाराच्या सोन्यासाठी भैय्या गायकवाडने खुन केला होता. त्याकडील सोने व चांदी घेऊन तो फरार
झाला होता. पोलिसांनी त्याकडून मोठ्या प्रमाणात सोने व चांदी जप्त केली.

2 COMMENTS

  1. Greetings from Idaho! I’m bored at work so I decided to browse your blog on my iphone during lunch break. I enjoy the information you present here and can’t wait to take a look when I get home. I’m surprised at how quick your blog loaded on my phone .. I’m not even using WIFI, just 3G .. Anyhow, good blog!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here