पुढील शैक्षणिक सत्रांचे प्रवेश सुरू, शाळांच्या हुकूमशाहीवर पालकांचा संताप

शाळा वर्ग ऑनलाइन, तरी प्रवेश शुल्क पूर्ण का.. ?

घारगाव :-

मागील दीड वर्षांपासून शालेय वर्ग ऑनलाइन होत आहेत. सध्या पुढील शैक्षणिक सत्राचे प्रवेश सुरू झाले आहेत. हे सत्रही ऑफलाइन होईल का ? याबाबत शंका आहे. तरीही शाळांकडून पूर्ण शैक्षणिक शुल्क, तसेच काहींकडून प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन वर्ग होत असताना, प्रवेश शुल्क अधिकचे का आकारले जात आहे, असा प्रश्न शाळांच्या हुकूमशाही धोरणाबाबत संतप्त पालकांकडून विचारण्यात येत आहे.


कोरोनामुळे समाजाची आर्थिक स्थिती विस्कटलेली आहे. अनेक पालकांच्या हातचे रोजगार सुटले आहेत, तर बहुसंख्यांच्या मिळकतीत घट झाली आहे. मात्र, या परिस्थितीतही शाळा प्रशासनाकडून मनमानी कारभार सुरू आहे. सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळा मार्च २०२० पासून बंद आहेत. २०२०-२१ हे संपूर्ण शैक्षणिक सत्र ऑनलाइन झाले.

त्यामुळे शाळांचे वीज बिल, इमारत देखभाल, पाणी बिल, सफाई खर्च, सुरक्षेचा खर्च आदींमध्ये बचत झाली. तरी मागील वर्षी पालकांकडून पूर्ण प्रवेश शुल्क आकारण्यात आले. गत वर्षभर पालकांनी शाळा शुल्क कमी करण्याची मागणी केली. मात्र, याबाबत शासनाकडून कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. या वेळी ज्या पालकांनी शुल्क भरले नाही. त्यांच्या मुलांचे ऑनलाइन वर्ग बंद करणे, शाळेतून काढून टाकणे, परीक्षा न घेणे, परीक्षेचा निकाल न देणे आदी कारवाई करण्यात आल्या. शेवटी हतबल पालकांनी शुल्क भरले. पण, यावेळी तरी पुढील सत्राबाबत अनिश्चितता असताना, केवळ ऑनलाइन वर्गाचे शुल्क शाळांनी घ्यावे, असे पालकांचे म्हणणे आहे.

असंघटित पालकांपुढे शाळांची वाढतेय मुजोरी
लसीकरणानंतरच मुलांना शाळेत पाठवणे शक्य होणार आहे. सध्या १८-४५ वयोगटासाठी लसीचा तुटवडा आहे. मुलांच्या लसीकरणास बराच कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शालेय वर्ग ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे शाळांनी प्रवेश शुल्क कमी करावे. लॅब, ग्रंथालय तसेच इतर शुल्क प्रवेशावेळी घेण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. पालक एकजूट नाही, शाळा प्रशासनापुढे ते कमी पडतात, त्यामुळे शाळांची मुजोरी वाढत आहे, असेही एका पालकाने सांगितले आहे.

शुल्काबाबत शासनाने लक्ष द्यावे
कोरोनामुळे वर्षभरापासून हाताला काम नाही. मुलाची मागील वर्षाची शालेय फी भरणे शक्य झाले नाही. वारंवार फी कमी करण्याची विनंती केली, पण शाळेकडून नकार देण्यात आला. सध्या शाळांनी माझ्या मुलांचे निकाल थांबवून ठेवले आहेत. अनेकांची हिच गत आहे. शासनाने प्रवेश शुल्काबाबत लक्ष घालणे आवश्यक आहे. – एक पीडित पालक.

3 COMMENTS

  1. I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

  2. fantastic post, very informative. I wonder why the other experts of this sector don’t realize this. You should proceed your writing. I’m sure, you have a huge readers’ base already!

  3. Excellent beat ! I would like to apprentice even as you amend your web site, how could i subscribe for a blog site? The account helped me a appropriate deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast offered vibrant transparent concept

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here