Mesta : इंग्रजी शाळांचा २५ टक्के फी कपातीचा निर्णय

कोरोनाने आई वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांना मोफत शिक्षण – मेस्टा

राष्ट्र सह्याद्री
नगर :  शैक्षणिक शुल्काच्या शक्ती बाबत नेहमी इंग्रजी शाळांना दोष दिला जातो. मात्र इंग्रजी शाळांच्या संचालकांनी एकत्र येऊन येत्या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांसाठी जिल्ह्यातील इंग्रजी शाळा मोफत शिक्षण देतील, अशी घोषणा ‘मेस्टा’ या संस्थेचे जिल्हाध्यक्ष देविदास गोडसे यांनी केली.

कोरोना संकटामुळे अनेक कुटूंबं उध्वस्त झाली. काहींचा रोजगार गेला तर काहींच्या घरात जिवित  हानी झाली. या पाश्वभूमिवर १५ जुनपासून ऑफलाईन किंवा ऑनलाईन शाळा सुरू करण्याची तयारी शासनाने चालवली आहे. शाळा सुरू होत असल्याने इंग्रजी शाळांनी कोरोना संकटामुळे फी कपात करावी, अशी मागणी पालक व विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याकरीता  नगर जिल्हयातील इंग्रजी शाळांच्या महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा ) या इंग्रजा शाळा संघटनेची जिल्हास्तरीय ऑनलाईन वेबिनार सभा पार पडली त्यात २०२१-२२ च्या  शैक्षणिक सत्रात शुल्कात २५ टक्के कपात करणे व कोरोनाने मृत्यु पावलेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला, अशी माहीती मेस्टाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. देविदास गोडसे यांनी बोलताना दिली. या वेबीनारला जिल्हा उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब काळे, उत्त्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष केशव भवर, महिलाध्यक्ष सोनाली सालके, सचिव प्रा. अशोक चौधरी, प्रा सतिश शिंदे, भाउसाहेब भडांगे, शिवाजी मुंडे, तालुका अध्यक्ष जे डी मापारी, सागर, बनसोडे, डॉ जितेंद्र शेळके, अंकुश पालवे , अनिकेत पठारे सागर बोरुडे ,भरत देशमुख , नागनाथ पानसरे, आर के पाटील, राजेंद्र ढवळे, शंतनु आढाव, सचिन अनारसे भारत देशमुख  वरील संस्थाचालक हजर होते.

फी सवलत व अनाथांना मोफत शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख शाळा…

सरस्वती इंग्लिश मेडियम श्रीरामपूर, शंभूराजे इंग्लिश मेडियम सिध्द्टेक कर्जत, गिताई इंग्लिश मेडियम पारगाव सु, ज्ञानांकुर इंग्लिश मेडियम पेडगाव, सनराईज इंग्लिश मेडियम श्रीगोंदा, पैस इंग्लिश मेडियम, रामकृष्ण इंग्लिश मेडियम खुपटी नेवासा, स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम निंबोडी पाथर्डी, संस्कार स्कूल कोंभळी कर्जत, न्यु डायमंड इंग्लिश मेडियम अंबी जळगाव, आर्मी कॅडेट स्कूल ज्योतीबावाडी मिरजगाव, सिल्व्हर ओक अकादमी शिर्डी राहता, आदर्श इंग्लिश मेडियम साकुर, बालपन इंग्लिश मेडियम पानोडी संगमनेर, लिटिल स्टार खर्डा जामखेड,विल्फिन गुरुकुलम हळगाव, सनराईज स्कुल बोधेगाव, पार्थ इंग्लिश स्कूल शेवगाव, चाईल्ड करियर सलाबतपुर नेवासा, माउली इंग्लिश मेडियम सुलतानपुर शेवगाव, शायनी रोज व फ्लाइंग बर्ड नगर शहर, जिनियस ग्लोबल स्कूल सावेडी नगर, छत्रपती पब्लीक लाडजळगाव, गुरुदत्त इंग्लिश मेडियम कोपरगाव, साई निर्माण शिर्डी, छत्रपती संभाजी स्कूल आखेगाव, आनंद विद्यामंदिर श्रीरामपुर, स्वामी विवेकानंद संगमनेर, प्रियदर्शनी स्कूल टाकळी ढोकेश्वर पारनेर.

126 COMMENTS

  1. Very nice post and straight to the point. I am not sure if this is actually the best place to ask but do you guys have any ideea where to employ some professional writers? Thanks in advance 🙂

  2. Sir dist madhalya saglyach shalana 25% discount dya sir. Shrirampur shaharamadhil ekahi shalecha ullekh nahiy sir. Sarvch English medium school la discount dya sir. Please.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here