अखेर अनलॉकचे आदेश जारी;  सोमवारपासून काय बंद,काय सुरू राहणार ?

मुंबई :

अखेर राज्य सरकारने काल रात्री उशीरा अनलॉकचे आदेश जारी केले आहेत.त्यानसार येत्या सोमवारपासून ५ टप्प्यांत अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावर निर्बंध शिथिल करण्यात येणार असून,त्यासाठी एकूण पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.पहिल्या टप्प्यात सर्व प्रकारची दुकाने,मॉल्स,थिएटर्स,मल्टिप्लेक्स,नाट्यगृहे नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत.

रेस्टॅारंट आणि लॉकल सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पाच टप्प्यात अनलॉक केला जाणार असल्याची घोषणा केली होती.मात्र लगेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून असा निर्णय झाला नसल्याचा खुलासा करण्यात आल्याने या गोंधळावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.

अखेर काल रात्री उशीराने राज्य सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.त्यानुसार पाच गट तयार करण्यात आले आहेत.

पहिला गट-

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे.

दुसरा गट

पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा या गटात समावेश केला जाणार आहे.

तिसरा गट-

पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या गटात केला जाणार आहे.

चौथा गट

पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश चौथ्या गटात केला जाणार आहे.

पाचवा गट-

पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश पाचव्या गटात केला जाणार आहे.

येत्या सोमवारपासून काय सुरू होणार ?

पहिला गट:

सर्व प्रकारची दुकाने सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरू होणार. रेस्टॅारंटही सुरू करण्याची परवानगी.लोकल सेवा सुरू होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली करण्याबरोबरच, वॉकिंग आणि सायकलिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी कार्यालये उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना मुभा देण्यात आली आहे. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावरील बंधने हटवण्यात आली आहेत. जीम,सलून,ब्युटी पार्लर,स्पा,वेलनेस सेंटर्स सुरू करण्याची परवानगी असणार आहे.तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुसरा गट :

सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स,नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी.लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात येणार, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहणार आहेत. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असणार आहे. सर्व खासगी कार्यालये उघडण्यास परवानगी असणार आहे. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ देण्यात आली आहे.चित्रीकरण सुरू असणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक,मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. लग्न सोहळा १०० जणांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील.जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल.

तिसरा गट :

तिसऱ्या गटामध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार बंद राहतील.चौथ्या गट : चौथ्या गटामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील, बाकी सर्व दुकाने बंदच राहणार आहेत.

पाचवा गट :

या गटात अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवार आणि रविवारसा मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील.

2 COMMENTS

  1. I just couldn’t leave your web site prior to suggesting that I extremely loved the usual information an individual supply to your visitors? Is going to be again regularly in order to inspect new posts.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here