Crime : भोर येथील एकास बलात्कार प्रकरणी अटक

भोर ; दि.५ : शहरातील एकास लग्नाचे आमिष दाखवून तसेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी भोर पोलिसांनी (शुक्रवार )अटक केली आहे. निलेश संपतराव धुमाळ (वय ३९ )रा. मशालजीचा माळ ; एसटी स्टँड ,भोर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून स्थानिक न्यायालयाने त्यास ८ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
निलेश धुमाळ याने संबंधित महिले बरोबर ओळख वाढवून तीस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले .अश्लील फोटो व्हायरल करण्याची तसेच फिर्यादी महिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली असल्याने संबधित महिलेने भोर पोलिसांत तक्रार दिली आहे.या प्रकरणी भादंवि कलम ३७६ (२)(एन ),३२३,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणास अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पवार , पोलिस कॉन्स्टेबल अमोल मूर्हे ,अनिल हिप्परकर , प्रमिला निकम ,कामिनी दाभाडे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here