व्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ

अंधाच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी ३६५ दिवस राहणार सतर्क. महाराष्ट्रात प्रथमच, सगळ्यात महत्वाकांक्षी चळवळ…..…………………………………………………

….
बोधेगाव        

 समाजजीवनात अनेक व्यक्ती डोळे नसल्याने हे जग पाहु शकत नाही. परंतु नेत्रदानाच्या माध्यमातून मात्र हे शक्य असल्याने ‘संकल्प नेत्रदानाचा’ ही चळवळ व्यंकटेश फॉंडेशन आणि मानकन्हैय्या नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दृष्टीदान दिनानिमित्ताने आज दि.१० रोजी सुरु करण्यात आली आहे.      

 अंधाच्या जीवनात, डोळा रुपी प्रकाशाच्या माध्यमातून त्याला जग दाखवण्याचा संकल्प केला असून ही चळवळ ३६५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे व्यंकटेश फॉंउडेशनने सांगितले आहे. 

महाराष्ट्रात व्यंकटेश मल्टीस्टेटच्या एकुण २२ शाखा, १५० कर्मचारी आणि दिड लाखाहून अधिक ग्राहक असुन त्यांना ‘संकल्प नेत्रदानाचा’ ह्या महत्वाकांक्षी चळवळीत स्वईच्छने सहभागी करून घेणार आहे. तसेच ग्राहकाबरोबर येणाऱ्या व्यक्तीना माहिती मिळण्यासाठी व्यंकटेशच्या प्रत्येक शाखेमध्ये व्हिडीयो स्क्रिन,  बोर्डच्या माध्यमातून  माहिती आणि नेत्रादानाचा फॉर्म भरून घेतला जाणार आहे.

व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमी समाजाभिमुख काम केले जात असुन दुष्काळात मुक्या जनावरांबरोबर पक्ष्याना देखील चारापाण्याची सोय केली असुन गेल्या दिड वर्षापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटात देखील हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीना मदतीचा हात पुढे करत त्याना आधार दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत काम करणाऱ्या व्यंकटेशने आता ‘संकल्प नेत्रदानाचा’ ही चळवळ उभारली असून त्याच्या माध्यमातून दृष्टीहिन नागरिकांना जग दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अवाहन व्यंकटेश फांउडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


   “अंध व्यक्तीच्या जीवनात डोळ्याना फार महत्व असते लिहिणे, वाचणे, पहाणे, आदी प्रकारच्या गोष्टी सदरील व्यक्ती करु शकत नाही परंतु नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान केले तर याच्या माध्यमातून समाजातील अंध व्यक्तीना हे सुंदर जग दाखवता येउ शकते आणि मरणानंतर ती व्यक्ती पुन्हा जग पाहु शकते त्यामुळे दोनदा जग पाहण्यासाठी आपण मरणोत्तर नेत्र करणे आवश्यक आहे”.  

( अभिनाथ शिंदे- अध्यक्ष व्यंकटेश फाउंडेशन.)

2 COMMENTS

  1. I have learn several excellent stuff here. Definitely price bookmarking for revisiting. I surprise how much effort you place to make this sort of wonderful informative site.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here