वाढीव फिडर मिळण्यासाठी सरपंचानी घेतली उर्जामंत्र्यांची भेट….

     शेवगाव तालुक्यातील कांबी, हातगाव, मुंगी याठिकाणी कमी दाबाच्या लाईटमुळे नेहमी खेळखंडोबा पहायला मिळत असल्याने शेतकऱ्यांना नेहमी आडचणीना सामोरे जावे लगत होते. त्यामुळे गावच्या सरपंचानी वाढीव फिडरच्या मंजुरीकरीता आज दि .१० रोजी  महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांची जिल्हा परिषद अहमदनगर येथे भेट घेत लाईट संदर्भातील समस्येला मोकळीक करून दिली.
    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती  डॉ क्षितिज भैया घुले,यांच्या सह कांबीचे सरपंच नितेश पारनेरे, हातगावचे सरपंच अरुण मातंग,
सामाजिक कार्यकर्ते बद्री बर्गे, सुबोध कुलकर्णी, भास्कर जावळे, राजेंद्र पाटील, अविनाश म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, नंदकिशोर म्हस्के, मुंगी सोसायटीचे मा चेअरमन मिलिंद गायकवाड, मार्केट कमीटीचे संचालक राजेंद्र ढमढेरे, राष्ट्रवादी युवकचे स्वप्नील राजेभोसले, गणेश देशमुख आधी उपस्थिती होते.
      यावेळी हातगाव येथील ५ एम व्ही ए क्षमता असलेल्या सबस्टेशनची माहिती देताना सांगण्यात आले कि, या सबस्टेशनमध्ये  हातगाव, मुंगी आणि कांबी गावठाण करीता एक फिडर तर उर्वरित दोन फिडर वर शेतीचा भार टाकण्यात आला असुन गेल्या कित्येक वर्षापासुन शेतीला कमी दाबाने आणि एक दिवसाआड विद्युत पुरवठा केला जात आहे.
विजेची मागणी जास्त आणि दाब कमी असल्याने शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षापासून लाईटच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे आज उर्जा मंत्री प्रजक्त दादा तनपुरे यांची भेट घेत समस्याना मोकळीक करुन देण्यात आली.

यावेळी प्राजक्तादादा यांनी आश्वस्त केले कि, महावितरणच्या नविन  नियमानुसार जमा होणाऱ्या विजबिलापोटीच्या रकमेतुन जिल्ह्याकरीता देण्यात येणाऱ्या ३३ टक्के निधीचा वापर हातगाव स्बस्टेसन मध्ये ५ एम व्ही ए चा एक ट्रंसफार्मर आणि दोन फिडर बसविण्यासाठी करण्यात येईल. याच बरोबर त्यांनी सदरील कामाबाबतच्या सुचना अहमदनगर ग्रामीणचे अधीक्षक अभियंता सूर्यवंशी यानाही दिल्या आहेत.

Attachments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here