धक्कादायक! कोरोना घटतोय पण… 24 तासांत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू

मुंबई :


देशात गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांना
कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी होत आहे.
मात्र अशी परिस्थिती असूनही चिंता कायम आहे. याचं कारण
म्हणजे गेल्या 24 तासांत आतापयरत सर्वाधिक
कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. हा
आकाडा आतापयरतचा सर्वात जास्त आहे.

गेल्या 24 तासातील आकडेवारी ध क्कादायक आहे.
भारतात गेल्या 24 तासांत मृत्यूदराने आतापयरतचा
रेकॉर्ड तोडला आहे. 94 हजार नवीन लोकांना
कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांचा रिपोर्ट पॉ
झिटिव्ह आला आहे. तर 6148 रुग्णांचा कोरोनामुळे
मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या
माहितीनुसार 24 तासांत 94 हजार 52 लोकांचा
रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मृत्यू
झालेल्या रुग्णांनाची संख्या आतापर्यंत सर्वात जास्त गेल्या 24 तासातली आहे.

कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 19 मे
रोजी सर्वात जास्त होती. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या
24 तासांत ही आकडेवारी रेकॉर्डब—ेक असल्यानं
चिंता व्येक्त केली जात आहे.


कोरोनाग्रस्तांमध्ये सलग 28 व्या दिवशी घट झाल्याचं
समोर आलं आहे. तर कोरोनातून बरे होणार्‍यांची
संख्या देखील चांगली आहे. गेल्या 24 तासात 1.51 लाखहून
अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे.


आतापर्यंत देशात 2 कोटी 76 लाख 55 हजार 493
लोकांनी कोरोना विरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला
आहे. तर देशात अ‍ॅक्टिव्ह केसेस कमी होत असल्या तरी
मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं चिंता व्येक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here