एकतर्फी प्रेमातून चिमुकल्याचे अपहरण श्रीगोंदा पोलिसांनी केले प्रेमवीरास जेरबंद 


श्रीगोंदा :

विवाहित महिलेला ” तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवून नेईल, अशी धमकी देऊन सहा वर्षाच्या मुलाला औरंगाबाद येथून पळवून आणणाऱ्या कथित प्रेमवीराला अटक करून श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने अटक केली आणि अपहृत मुलाची सुखरूप सुटका केली. आरोपी सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) याला अटक करून अपहरणाच्या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केले.  


औरंगाबाद येथिल बजाज नगर मध्ये राहणारे परशुराम नवनाथ रासकर (वय 36 वर्षे) यांच्या  नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना माहीती दिली की ,परशुराम रासकर यांचा सहा वर्षांचा मुलगा अभिनव यास सागर आळेकर (रा.श्रीगोंदा) याने परशुराम रासकर याची पत्नी हीचेसोबत प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवुन नेईल असे म्हणुन अभिनव यास त्याचे कडील स्विफ्ट डिझायर गाडी नं.एम.एच.42 ए.एच.9655 मध्ये किडनॅप करुन श्रीगोंद्याकडे येत आहे.

थोड्याच वेळापुर्वी अहमदनगर कायनेटिक चौकातुन दौंड रोडने गेला आहे, अशी माहीती मिळाली.त्यावरुन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश देवुन तात्काळ रवाना केले.

नाकाबंदी दरम्यान सायंकाळी 06 वाजेच्या सुमारास संबंधित स्विफ्ट डीझायर गाडी अहमदनगर कडुन दौंड कडे जाताना दिसल्याने ती थांबवुन त्यातुन आरोपी सागर गोरख आळेकर (वय 27 वर्षे,रा.आळेकरमळा,श्रीगोंदा ता.श्रीगोंदा) यास त्याने पळवुन आणलेल्या 06 वर्षाच्या अभिनव रासकर सह ताब्यात घेतले.

मुलास त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले. 

याप्रकरणी फिर्यादी परशुराम रासकर यांचे फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी.वाळुज ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीस पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस अधिक्षक  मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ठिकले, सपोनि दिलीप तेजनकर, चालक सफो रमेश जाधव, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकॉ गोकुळ इंगवले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here