पारनेरकरांना कुकडीचे एक TMC पाणी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाळावा

मुख्यमंत्र्यांच्या झूम मिटिंगमध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांचे आवाहन

दत्ता गाडगे । राष्ट्र सह्याद्री….

पारनेर : पारनेरकरांना २००४ साली एका जाहीर सभेतुन १ टीएमसी पाणी देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.तो शब्द अजितदादांनी पाळावा असे विधान महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील माजी आमदारांची एक झुम मिटींग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दि.१२ जून रोजी रात्री ८ वाजता घेतली होती. यावेळी बोलताना राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी पारनेरच्या पाणीप्रश्नावर उप मुख्यमंत्री अजित पवारांना कैचित पकडले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत एक मिटींग बोलवावी आणि त्या मिटींगसाठी मलापण बोलवावे. त्याठिकाणी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी पारनेरच्या जनतेला २००४ साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देईल आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे औटींनी मागणी केली आहे.
सध्या राज्यामधे महाविकास आघाडीचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत.त्यांनी सन २००४ मध्ये पारनेर येथील एका जाहीर सभेमधे कुकडी प्रकल्पातून एक टीएमसी पाणी पारनेरकरांना देईल असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला नसुन, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एक टीएमसी पाणी देऊन त्यांनी हा शब्द आता पाळावा तसेच पारनेर तालुक्या मधील जनतेला दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केली आहे.

माजी आमदारांच्या झुम मिटींगमधे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर विजयराव औटी यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे.या झूम मिटिंग मध्ये बोलताना राज्य विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढविला आहे. या मिटींगसाठी अनेक माजी आमदार उपस्थित होते.
कुकडी धरणातून पारनेरला एक टीएमसी पाणी मिळायला हवे अशी मागणी पारनेरकर सातत्याने करत आली आहे.सलग २० वर्षापासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यामधे आता महाविकास आघाडीचे सरकार असून अजितदादा पवार आपल्या नेतृत्वाखालील सरकारमधे काम करत आहेत. सन २००४ मध्ये पारनेर मधील कान्हुर पठार येथे झालेल्या जाहिर सभेत अजितदादांनी पारनेरला एक टीएमसी पाणी देऊ असा शब्द दिला होता. त्याचा लाभ परिसरातील १० हजार हेक्टर परिसराला होणार असल्याचे ते बोलले होते.
आता या गोष्टीला १७ वर्षे उलटली तरि आश्वासन दिलेले आश्वासन अजित पवार यांनी पाळावे असे औटी म्हणाले. आपण विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून, आपण पारनेर करांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी अशी विनंती विजयराव औटी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यामुळे उमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची कोंडी होते की काय हे पाहणे देखील औच्छुक्याचे ठरणार आहे. पाणीप्रश्नावर पारनेरकरांवर नेहमीच अन्याय होत आलाय. तर दुसरीकडे कुकडी धरणातून एक टीएमसी पाणी देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाण्याचे जनतेला दिले होते.त्याच अतिमहत्वाच्या आश्वासनाची आठवण विजयराव औटी यांनी करुन दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here