शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,
महाराष्ट्र राज्य ,
मुंबई

महोदय, आपण मुख्यमंत्री व्हावे ही आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण झाली.

परंतु महाराष्ट्रातील जनतेला जागोजाग पेरलेले सचिन वाजे भेटत आहेत प्रत्येक खात्यात पैसा गोळा करण्यासाठी सर्वजण बेकायदेशीरपणे वाटमारी करत आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याप्रमाणे व्याज आकारणी करणे अपेक्षित आहे कराड येथील कराड मर्चंट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेने तीस लाखावर एक कोटी 79 लाख रुपयात आकारणी केली आहे यावर आम्ही कमिशनर को-ऑपरेटिव्ह पुणे यांचेकडे तक्रार केली असता त्याने जिल्हा स्पेशल ऑडिटर कडे व्याज आकारणी साठी प्रकरण पाठवले.

जिल्हा स्पेशल ऑडिटरनी फक्त तीस लाखावर 78 लाख रुपये आकारणी केली दोन्हीमध्ये एक कोटी एक लाख रुपयाचा फरक आहे तरीही त्या पतसंस्थेवर कमिशनर कारवाई करत नाही सहकार मंत्री मान्य बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली तरीही त्याने कोर्टात जाण्याचा सल्ला दिला माननीय मंत्र्याने कारवाई करणे अपेक्षित होते परंतु अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करून पैसा कमावणे हा राज्यकर्त्यांचा धंदा झाला आहे हे स्पष्ट झाले.


साखर कारखान्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सारखा भाव दिला पाहिजे असा कायदा असताना काही शेतकऱ्यांना राजाराम बापू पाटील या कारखान्याने 114 रुपये प्रति टन कमी दिले आहेत. तसेच प्रसाद साखर कारखान्याने प्रति टन दोनशे एकवीस रुपये काही शेतकऱ्यांना कमी दिले आहेत. याबाबत साखर आयुक्त यांचेकडे तक्रार केली असता या साखर कारखान्याने साखर आयुक्तांना याबाबत निर्णय घेण्याचा अधिकारच नाही असे लेखी कळवले.


यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही याबद्दल शासनाने मला कळवावे अस साखर आयुक्तांनी शासनास कळवले आहे या दोन्ही साखर कारखान्याचे नेते आपल्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यामुळे शासनाचे आयुक्तांना उत्तरच मिळत नाही.

त्यामुळे आमचा निर्णय अडकून राहिला आहे शेतकऱ्यांचे करोडो रुपये या कारखान्याने हडप केले आहेत परंतु तुमच्या शासनाकडून निर्णय ही मिळत नाही त्यामुळे आम्हास कोर्टा तही न्याय मागता येत नाहीआपल्या सरकारच्या कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस साहेब सांगली येथील मास्तोळी नावाच्या अधिकाऱ्याची गेले वर्षभर चौकशी चालू आहे निर्णय होत नाही आंबेजोगाई जिल्हा बीड येथील गोडाऊन किपर असलेल्या सुधीर रोकडे याने कोट्यावधी रुपयाची शेतकऱ्यांसाठी आलेली साधन सामग्री परस्पर बाजारात विकले त्यावर आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय कालिदास आपेट याने तक्रार केली असता त्याची चौकशी न होता फक्त बदली झाली आहे तुमच्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गाईच्या दुधाचे प्रति लिटर 27 रुपये देण्याचेठरले होते.

परंतु एकाही दूध संकलन करणाऱ्या सहकारी संघाने हे भाव दिले नाहीत सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस ने कोणतीही कारवाई केली नाही कारण हे सर्व दूध गोळा करणारे आमदार त्यांच्या सरकारला पाठिंबा देत होते यावर आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने सुमारे सात हजार कोटी रुपये दूध उत्पादकांना दिले पाहिजेत असा निर्णय दिला.

या आधारे आम्ही आपल्या शासनाकडे ही मागणी केले आहे परंतु दुग्ध विकास मंत्री निर्णय घेत नाहीत कारण दूध संघांच्या पाठिंब्यावर आपले सरकार टिकून आहे अजून आपल्या सरकारची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सांगता येतील.

वरील सर्व सर्व भ्रष्टाचार पुराव्यांनिशी सिद्ध झालेला आहे आपला या शेतकऱ्यांच्या लुटीत जर वाटा नसेल तर या भ्रष्ट मंत्र्यांच्या वर कारवाई करावी व आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा बाजार समितीच्या कायदा कलम 34 प्रमाणे शेती मालाचे पैसे मिळणे अपेक्षित असताना कोणत्याही बाजार समितीमध्ये मिळत नाहीत यावर कोण कारवाई करणार तरी आपण याबाबत लक्ष घालून त्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कष्टाचे घामाचे दाम मिळवून द्यावे ही विनंती कळावे.

आपला विश्वासू .
मा.रघुनाथदादा पाटील.
अध्यक्ष, शेतकरी संघटना.
महाराष्ट्र राज्य.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here