“सीबील स्कोअर, व्यापाऱ्यांना पडला घोर”…!
” ब्रेक द चैन:” मुळे बँकेचे हप्ते थकले .


शिरुरकासार :


कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अभियान? शासनाने सुरू केलेआहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद आहे. मात्र, त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा सुरू झाला आहे. हप्ते वेळेवर न भरल्यामुळे अनेक व्यवसायिकांचा सीबील स्कोअर खराब होऊ लागले आहे. परिणामी पुन्हा बँक कर्जासाठी दारात उभ्या करणार नसल्याने ” सीबील स्कोअर व्यावसायिकांना घोर ” अशी अवस्था सध्या तालुक्यातील व्यापाऱ्यांची झालेली दिसून येऊ लागली आहे.

दुकाने बंद असल्याने बँकेच्या सीबील बरोबरच आर्थिक फटका देणारे हे कसले ब्रेक द चेन अभियान..? असा प्रश्न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.
शिरुरकासार तालुक्यात मुख्य बाजारपेठेत ,तसेच ग्रामीण भागातील मोठ्या मोठ्या गावात ,अनेक व्यावसायिक आपापले व्यवसाय थाटून बसलेले आहे.

हे व्यवसाय उभे करतांना अनेकांनी बँकांचे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. मात्र मागील वर्षभरापासून कोरोनामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांनी पुन्हा व्यवसायास सुरुवात केली.

गाडी पुन्हा रुळावर येत असताना दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेन अभियान सुरू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवल्यामुळे बँकेचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे बँका व खाजगी पतसंस्थेचा हप्ता भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे तगादा सुरू झाला आहे. ठरवून दिलेल्या वेळेत बँकेचे हप्ते भरले गेले नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे सीबील स्कोअर खराब होतांना दिसून येऊ लागले आहे.

त्यामुळे पुन्हा कर्जासाठी बँक दारात उभे करणार नसल्याने व्यवसाय पुन्हा सुरळीत कसा आणायचा याचा प्रश्न व्यापाऱ्यांना पडू लागला आहे. या ब्रेक द चैन निर्णयाचा व्यापारी संघटनांकडून विरोध होत आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. छोटे व्यावसायिक आणखी संकटात सापडले आहेत. दुकानात माल पडून असून व्यापाऱ्यांचे पैसे थकले आहे. अनेकांना घर चालविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हे ब्रेक द चेन नव्हे एक प्रकारचे लॉकडाऊनच असल्याने सर्व लहानमोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत

446 COMMENTS

 1. Undeniably believe that which you stated. Your favorite justification appeared to be on the internet
  the simplest thing to be aware of. I say to you,
  I definitely get irked while people think about worries that they just don’t know about.
  You managed to hit the nail upon the top as well as defined
  out the whole thing without having side effect , people could take a signal.
  Will likely be back to get more. Thanks http://hydroxychloroquined.online/