उजनी पाणी प्रश्नी पुकारलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन अखेर स्थगित

सिद्धार्थ मखरे

इंदापूर ( प्रतिनिधी ) :
इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी मंजुरी रद्द केल्या नंतर पीपल्स रिपब्लिकन पक्षाने आक्रमक पावित्रा घेत पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरून तद्नंतर पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन आज अखेर तेराव्या दिवशी इंदापूरचे तहसीलदार यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.

इंदापूर तालुक्यातील २२ गावांना ५ टि. एम.सी पाणी मंजुरी मिळाली होती ती रद्द करण्यात आली त्याचा फेर विचार करून २२ गावांना ५ टि. एम.सी पाणी पूर्ववत करून मंजूर करून न्याय द्यावा,उजनी धरणातून मराठवाड्यासाठी जाणारा पाण्याचा बोगदा ( मार्ग ) हा तात्काळ बंद करण्यात यावा,उजनी धरणामध्ये मराठवाड्यासाठी २१ टि. एम.सी ची तरतूद व चालू असलेले ७ टि. एम.सी पाणी हे तात्काळ रद्द करण्यात यावे,उजनी धरणामधून नदी,कॅनॉल,सीना माढा ( बोगदा ) ८ माई ची परवानगी असताना जे ज्यादा बेकायदेशीर पाणी सोडण्यात येते ते तात्काळ बंद करण्यात यावे,उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात वाटप झालेल्या जमिनी धनदांडग्यानी दमदाटी करून वाहिवाटीस अडथळा निर्माण करून जमिनी खरेदी करून घेतल्या त्या जमिनीच्या खरेद्या रद्द करून त्या धरण ग्रस्तांना परत करण्यात याव्या अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलन पुकारले होते.

प्रसंगी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांना आपल्या असलेल्या मागण्या सरकार दरबारी पोहचवण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.मात्र सदरील मागण्यांसह शेतकऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास या पुढील काळात पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संजय सोनवणे यांनी दिला आहे.

यावेळी धनंजय तांबिले, दस्तगीर नायकुडे, प्रदीप राखुंडे, सतीश पांढरे, बाबासाहेब झेंडे, संतोषी ननवरे,अभिजित गायकवाड,महादेव ननवरे, गोरख सोनवणे,विजय सोनवणे, वामन सोनवणे, अंगद गायकवाड, बापू सोनवणे, सुभाष डरंगे,विकास भोसले,वैभव भोसले यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here