विद्यार्थी, पालक वर्गात संभ्रम.”……
“बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घ्यावा”

शिरुरकासार (प्रतिनिधी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्या अनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घ्यावा कारणं
12 वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो. यासाठी सीईटी परीक्षा महत्त्वपूर्ण असते.


या सीईटीच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तयारी सुरू करावी. 12 वी चा निकाल लागल्यानंतर त्वरित प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात यावीत ज्या विद्यार्थ्यांना समान गुण मिळतील अशा काही अडीअडचणी सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल याबाबत निर्णय घेण्यात यावे असे मत विद्यार्थी वर्गातून होत आहे
आणि आता बारावीची परीक्षाही रद्द झालेली आहे. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमांना नेमका प्रवेश कसा मिळणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून


अडचणीत सापडले आहेत. शासनाने या संदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर करावा, अशी मागणी पालक, विद्यार्थी तसेच सर्वच स्तरांतून होत आहे.
पहिली ते बारीवी पर्यंतचे विद्यार्थी विनापरिक्षा पास तर झाले, किंवा होतील परंतू पुढील प्रवेशाचे काय याची चिंता विधार्थी व पालकातून व्यक्त करण्यात येत आहे.
……………. 

3 COMMENTS

 1. Its like you read my mind! You seem to know a lot about this, like
  you wrote the book in it or something. I think that you
  can do with some pics to drive the message home a bit,
  but instead of that, this is magnificent blog. A
  fantastic read. I’ll definitely be back.

  my site weed vape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here