Covid Center:  एकजुटीने व निस्पृहतेने काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते…

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले बेलापूर कोविड सेंटर मधील रुग्णसेवेचे कौतुक

धन्वंतरी पूजन  व वृक्षारोपणाने झाला समारोप

बेलापूर :-एकजुटीने व निस्पृहतेने काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करता येते हे येथील ग्रामपंचायत, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, कोरोना समिती, व्यापारी व मेडीकल असोशिएशन, प्राथमिक आरोग्य केन्द्र यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित बेलापूर मोफत कोवीड सेंटरने दाखवून दिले आहे. या सेंटरमुळे शासन यंञणेवरील ताण हलका झाला तसेच सर्वसामान्य कोवीडग्रस्तांनाही दिलासा मिळाला, असे मत तहसीलदार प्रशांत पाटिल यांनी व्यक्त केले.     

बेलापूर येथील प्राथमिक शाळेतील मोफत कोवीड सेंटरचा तहसीलदार श्री.पाटील यांचे हस्ते धन्वंतरी पूजन  व वृक्षारोपण करुन समारोप झाला. श्री.पाटील यांनी मोफत कोवीड सेंटरने संकटकाळी दिलेल्या सेवेचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोरोना संकटाने सर्वांनाच चिंतेत टाकले होते. अशा संकटसमयी बेलापूरकरांनी मोफत कोवीड सेंटर सुरु केले.

या सेंटरमध्ये एकूण २५० रुग्णांवर मोफत औषधोपचार तसेच त्यांची राहाण्याची व जेवणाची सोय केली. यामुळे शासन यंञणेवरचा ताण हलका झाला. समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी देणग्या देवून तसेच अन्नदान करुन दिलेले योगदानही आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.      जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेन्द्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तसेच देणगीदार, अन्नदान, अल्पोपहार, रुग्णसेवा करणारे स्वयंसेवक, ग्रामस्थ, पञकार आदींचे आभार मानले. याप्रसंगी सर्वश्री रणजित श्रीगोड, भाऊ डाकले, पञकार देविदास देसाई, नवनाथ कुताळ, विष्णुपंत डावरे,ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे, कामगार तलाठी कैलास खाडे, पोलिस पाटिल अशोक प्रधान, मच्छिन्द्र निर्मळ, सुधीर काळे, रविन्द्र गंगवाल, शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, जालिंदर कु-हे, भास्कर बंगाळ, भाऊसाहेब कुताळ, प्रकाश नवले, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, प्रविण लुक्कड, पंकज हिरण, यादव काळे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, बाळासाहेब दाणी,साहेबराव वाबळे मोहसिन सय्यद, अशोक राशिनकर, अकबर सय्यद, हर्षद दुधाळ, सुहास शेलार, शफीक आतार, किरण गागरे, गणेश बंगाळ, शफिक बागवान, विशाल आंबेकर, दादासाहेब कुताळ, प्रशांत मुंडलिक, राहुल माळवदे, रोहित शिंदे, सचिन वाघ, गोपी दाणी, अशोक मेहेत्रे, सुधीर करवा, अरुण अमोलिक, नितीन नवले, दिलीप अमोलिक, किशोर खरोटे, सतीश शेलार, हर्षद दुधाळ, सोमनाथ जावरे, शुभम नवले, अजय शेलार, रावसाहेब अमोलिक, विशाल शेलार, भास्कर वारे, महेश कु-हे, सद्दाम आतार, नंदू शेलार, सुनील साळुंके, बाळासाहेब शेलार, भारत बुर्गुल, केशव काळे, अजित शेलार, प्रतिक काळे, सुखदेव गायकवाड, निखिल शेलार, अनिकेत भडके, सोनू खैरे, फिरोज सय्यद, सुभाष शेलार, ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, राजेंद्र भिंगारदिवे, योगेश अमोलिक, दत्तात्रय वक्ते, अविनाश शेलार, सचिन नगरकर, रवी मेहेत्रे, रवी बागडे, गौरव वाडीया आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here