शेतकरी संघटना : सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ….

‘हक्कासाठी संघटित व्हा : ॲड.अजित बी.काळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन’

श्रीरामपूर :
शेतकरी संघटनेने सभासद नोंदणी अभियान सुरु केलेले आहे .आपण सर्व जनता आता संघटित झाल्याशिवाय आपल्या न्याय हक्कासाठी, तसेच शेतमालाला योग्य भाव मिळणेसाठी,तसेच विज,पाणी, खत, शेत विम्याचा प्रश्न, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होत आहेत ते जर ताकदीने सोडवायचे असतील तर शेतकरी संघटना मजबूत केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.

आता विचाराच्या बरोबरच संख्येला सुदधा महत्व प्राप्त झाले आहे व हाच हा धागा पकडून शेतकरी संघटनेने सभासद नोंदणीला सुरवात केली आहे. वरील प्रश्न हे सार्वजनिक वाटत असले तरी ते वैयक्तिकच आहेत. आपल्या शेतकरी कुटुंबाचे आहेत. आपण सगळे जाणताच कि शेतकरी संघटनाचे रघुनाथदादा, कालिदास आपेट, ॲड.अजित काळे, नाना नांदखेले व इतर अनेक कार्यकर्ते हे प्रामाणिक पणे संघटनेचे काम करत आहोतच, परंतु या मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व शेतकरी संघटनेचे शकले करून पोट भरणाऱ्या लोकांना चाप बसण्यासाठी तसेच शेतकरी समस्यांना स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांच्या हातचं बहुल होण्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी होणं गरजेचं आहे.

त्यामुळे सदरील अभियान हाती घेण्यातआले आहे . त्यामुळं शेतकरी हिताची अंमलबजावणी योग्य मार्गने होण्यास मदत मिळेल.आज संघटनांच खुप पीक आले आहे, व त्यामुळे विचाराला धार राहिली नाही.कोणताही दूरगामी विचार न करता आंदोलने केली जातात व त्यात नंतर तडजोड केली जाते व त्याचा फटका हा सर्वसामान्य शेतकऱ्याला बसतो.त्यामुळे विचार करा आपल्याला आपल्या भावी पिढीला सम्मानमाने जगण्यासाठी एक चांगली व्यवस्था निर्माण करून द्यावयाची असेल तर आताच सावध व्हा. आपण कोणत्याही राजकीय विचाराचे असले तरी प्रथम आपण शेतकरी आहोत हे लक्षात ठेवा.बाकी आपण सुज्ञ आहात.त्यामुळे अपेक्षा करतो की आपण संघटनेचे सभासद होऊन संघटनेला ताकद द्याल ..
असे आवाहन उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड.अजित बी.काळे यांनी केले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here