Education ; शाळेची 50 टक्के फी माफ करावी – मनसेचे प्रकाश जमधडे यांची मागणी

वाघोली, पुणे : गेल्या वर्षभरापासून कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच कुठल्याही विद्यार्थ्यांचे वर्ग भरलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून 100 टक्के फी घेणे हे चुकीचे असून शिक्षण संस्थांनी या फीमध्ये 50 टक्के कपात करून फी माफी द्यावी अशी मागणी मनसेचे वाघोली अध्यक्ष प्रकाश जमधडे यांनी केली.

भारतीय जैन संघटना शाळेतील पालकांसोबत शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन फी माफी संदर्भात सोमवारी (ता.२१) निवेदन दिले. निवेदनात ५०% फी माफीची मागणी केली आहे. यावेळी सतीश सावंत, राजू वाघ, अंबादास बनसोडे, शंकर बजरंगेकर, सुजाता कामठे आदी उपस्थित होते.

श्री जमधडे म्हणाले की, ” कोरोना काळात अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत. व आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. शाळेचे वर्ग वर्षेभर भरलेले नाहीत तरी शाळा व्यवस्थापनाने याचा विचार करून फी माफी करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.

भारतीय जैन संघटनेअंतर्गत असलेल्या मुख्यध्यापकांनी या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत शाळेच्या व्यवस्थापनशी बोलून यावर लवकर निर्णय घेऊ असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here