……यामुळे वाढले वीज पडण्याचे प्रमाण: वीज पडून देशात दरवर्षी दोन हजार व्यक्तींचा मृत्यू

हरिताच्छादन कमी झाल्याने वीज पडण्याच्या प्रमाणात वाढ
—–देशात वीज पडून दरवर्षी
दोन हजार व्यक्तीचा मृत्यू
———————-


– हरिताच्छादन कमी झाल्याने पडण्याचे प्रमाण वाढले; मृत्युच्या घटनांही वाढल्या
– विजेच्या माहितीसाठी दामिनी अॅपचा वापर करावा
– वीज पडण्याच्या काळात झाडाखाली नागरिकांनी थांबू नये.
– गरज असल्यास झाडांच्या फांद्यापासून पाच ते सहा फुट अंतर राखणे गरजेचे


—————
पुणे :  हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ, वाढते शहरीकरण यामुळे वीज पडण्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय त्या घटनेतील मृत्युदर वाढत
आहे. भारतात दरवर्षी दोन हजार नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू होतो. यामध्ये सर्वाधिक संख्या ही मध्यप्रदेश राज्यात आहे. महाराष्ट्रातही विदर्भ आणि विदर्भात
भागात वीज पडून नागरिकांचा मृत्यू होणारी संख्या अधिक असल्याची माहिती भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र विभागाच्या वीज विभागाचे प्रमुख एस.डी.
पवार यांनी दिली.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता.१९) भारतीय उष्णकटिबंधीय
हवामान संस्थेतील (आयआयटीएम) वरिष्ठ संशोधक डॉ. सुनील पवार यांनी “भारतात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण’ याविषयावर मार्गदर्शन
केले. या कार्यशाळेत हवामान तज्ज्ञ डॉ. ए.के. सहाय यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भारतीय हवामान विभागातील अधिकारी निलेश वाघ, आयआयटीएम’चे
डॉ. सचिन घुडे, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातील संशोधिका शुभांगी भुते, हवामान तज्ज्ञ डॉ. जी.आर. कुलकर्णी, के.एस होसाळीकर आदि उपस्थित होते.  

डॉ. पवार म्हणाले की, देशातील हरित आच्छादन कमी झाल्याने होणारे हवामान बदल आणि त्याच्या प्रतिकूल परिणामांबाबत सातत्याने चर्चा केली जाते. मात्र,
शहरांमध्ये वाढलेल्या इमारती, डोंगरावरील कमी होत असलेली झाडी यामुळे वीजा पडण्याचे प्रमाण वाढत आहे. ढगातून अत्यंत वेगाने वीज जमीनीकडे जात असल्याने
काही वेळातच होत्याचे नव्हते होते. जगात दरवर्षी वीस हजाराहून अधिक, तर भारतात दरवर्षी दोन हजार नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू होतो. यामध्ये सर्वाधिक
संख्या ही मध्यप्रदेश येथे आहे. त्यापाठोपाठ ओडिशा, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यात आहे.

महाराष्ट्राबाबत सांगायचे झाल्यास राज्यात मराठवाडा आणि विदर्भ या भागात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच दुपारी एक वाजल्यानंतर
वीज पडण्यास सुरवात होऊन, दुपारी चारनंतर याचे प्रमाण सर्वाधिक असते सर्वसामान्य या वेळेत बहुतांश नागरिक घराबाहेर पडलेले असल्याने, त्यांना वीजेचा
तडाखा बसण्याचे प्रमाण अधिक आहे. मॉन्सूनपूर्व पाऊस पडताना वादळी वाऱ्याबरोबर वीज कोसळत असून अचानक झाडावर वीज कोसळते. त्यामुळे पावसापासून
बचाव करण्यासाठी थांबलेल्या नागरिकांवर वीज पडते आणि ते मृत्यूमुखी पडतात. देशात १९६८ पासून वीज कोसळून पडलेल्या नागरिकांची आकडेवारी आहे. तर १९९५
पासून वीज कोसळून मृत्यूमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.  
—————


शेतकऱ्यांसाठी दामिनी अॅप महत्वाचे :
पावसाळ्यात वीज कोठे पडणार आहे, याची माहिती व्हावी यासाठी हवामान विभागाने दामिनी अॅप तयार केले आहे. या अॅपमुळे आपल्या परिसरातील किमान २५
किलोमीटर अंतरात कोठे वीज पडणार आहे, याची माहिती मिळते. याबरोबरच या अॅपमध्ये गावाचे नाव टाकल्यास त्या गावामध्ये वीज पडणार आहे की नाही याचीही
माहिती मिळू शकते.
———————-


वीज पडून मृत्युमुखी पडण्याची प्रमुख कारणे…
– शहरीकरण
– तापमानवाढ
– नागरिकांमधील माहितीचा अभाव
– पूर्व-सुचना न मिळणे
– सुचनांकडे होणारे दुर्लक्ष
————————


“एनसीआरबी’च्या अहवालानुसार…
– २०१९-२०२० मधील मृत्युंची संख्या – १७७१
– झाडाखाली उभे असल्याने बळी ठरलेल्यांचे प्रमाण – ७१ टक्के
– थेट वीज पडून मृत्युमुखी पडलेले – २५ टक्के
– अप्रत्यक्षपणे बळी ठरलेले – ४
—————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here