Covid-19 third wave: आरोग्य सुविधेवर जिल्हाधिकाऱ्यांचे बारीक लक्ष!

श्रीरामपूर : कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी श्रीरामपूर येथे आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन ऑक्सीजन प्लांट तसेच वाढीव 50 ऑक्सिजन बेड सुविधेच्या कामाची त्यांनी पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश बंड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या क्षमता वाढीसाठी प्रशासनाने दक्ष राहून कार्यवाही करावी, तसेच कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी देखील मास्कचा वापर, सामाजिक अंतरासारख्या उपायांचा अवलंब करावा, विवाह समारंभ शक्य तितकी कमी उपस्थिती ठेवून पार पाडण्याचे व कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी गावागावातील पदाधिकाऱ्यांनी हिवरेबाजारच्या धर्तीवर एकजुटीने काम करून गावे कोरोनामुक्त ठेवण्याची गरज प्रतिपादित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here