Shiv Rajyabhishek : निमगाव जाळी येथे शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

अशोक गोसावी । प्रतिनिधी

निमगाव जाळी: –

आज दिनांक २३ जून २०२१ रोजी सकाळी 9 वाजता हनुमान मंदिर, निमगाव जाळी ता. संगमनेर येथे स्वयंसेवक संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठया उत्साहात कोविड-19 च्या नियमांचे पालन करत साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर व वक्ते श्री एस.झेड. देशमुख सर यांचे शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले…..
त्यानंतर प्रमुख वक्ते एस.झेड. देशमुख सर यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र थेटे यांचे हस्ते व सरपंच अमोल जोंधळे,पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांचे उपस्थितीत करण्यात आला.

प्रमुख वक्ते श्री.एस. झेड.देशमुख सर यांनी व्याख्याना दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती विषद केली व बहुतांशी आपल्याला माहीत नसलेल्या इतिहासाचा उलगाडा करून सांगितला…
निमगावजाळी गावाचे पूर्वीपासून इतिहासासाठीचे असलेले योगदान याचाही उल्लेख करण्यात आला व यावेळी अयोध्येतील राम मंदिर उभारणी करता ग्रामीण भागातील निधी संकलनातील सर्वोत्कृष्ट गाव असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
यावेळी मा.सरपंच अमोलभाऊ जोंधळे,
मा.सभापती मच्छिंद्र थेटे ,पोलिस पाटील दिलीप डेंगळे,श्री. भाऊसाहेब डेंगळे,श्री.अण्णासाहेब साठे, संघ स्वयंसेवक श्री.राजाभाऊ देशपांडे, हृषीकेशजी जोशी,योगेशजी कुलथे,पंकजजी नाके यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले,या कार्यक्रमास पंचक्रोशीतील हिंदू स्वयंसेवक व
ग्रामस्थ उपस्थित होते
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा प्रमुख सुदर्शन जोंधळे, मंडल प्रमुख विनायक टिळेकर, मंडल सहप्रमुख रामकृष्ण लंगोटे सर,श्री संजय अण्णासाहेब थेटे,
ओम बिडवे,प्रभाकर टिळेकर, यांनी परिश्रम घेतले,अश्विनीताई बिडवे यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढविली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here