Loan Recovery : ‘या’ बँकेच्या 191 थकीत कर्जदारांच्या मालमत्ता होणार जप्त..!

नगर: विविध घोटाळ्यांनी गाजत असलेल्या नगर अर्बन मल्टी स्टेट बँकेत आज बनावट सोने तारण कर्ज उघडकीस आले. अनेक कर्जदारांनी बेन्टेक्स दागिने ठेवून बँकेतून सोनेतारण कर्ज घेतले व ते कर्ज थकविले. लिलावादरम्यान सोने बनावट आढळल्याने सोनार व लिलाव घेण्यास इच्छुक असलेले ग्राहक निघून गेले. या प्रकरणाची गंभीर दखल बँकेवरील प्रशासकीय मंडळाने घेतली असून तब्बल 191 थकीत कर्जदारांवर तातडीने लक्ष केंद्रीत करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून लवकरात लवकर लिलाव करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्याचबरोबर तोटा कमी करण्यासाठी बँकेने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. बँक बचाव कृती समितीसह कामगार कर्मचारी महासंघाने या निर्णयाला विरोध केला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार कपातीचा निर्णय तूर्तास चर्चेत घेतला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. नगर अर्बन बँकेतील वाढत चाललेल्या एन पी ए व तोट्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व बँकेने अनेक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने, भांडवली गुंतवणूक करू नये, खर्च कमी करावा, या सूचनांचा समावेश आहे.

बँक बचाव कृती समितीने काही बोगस कर्जप्रकरणांचा संदर्भ देत बँकेचे प्रशासकांना जाब विचारला असता त्यांनी बँकेचे अधिकारी राजेंद्र डोळे यांना उत्तर देण्यास पाचारण केले. परंतु डोळे यांना देखील उत्तर देता आले नाही व ऑडीट रिपोर्ट घेवून येतो, असा बहाणा करून डोळेंनी देखील तेथून पळ काढला.
बँकेच्या वसूली संदर्भात बँक बचाव कृती समिति जाब विचारत असताना प्रशासक “मला माहीत नाही, मी माहीती घेतो, नंतर सांगतो” अशी वेळकाढू उत्तरे देवू लागले.
प्रशासकांच्या असे वेळकाढू उत्तरांमुळे गोंधळ वाढला व या गोंधळाचा फायदा घेत प्रशासक व बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पलायन केले.

बँक बचाव समितीने बँकेचे प्रशासनाला लेखी पत्र देत बँकेचे वसूली चे परिस्थिति ची सविस्तर माहीती बँकेचे सभासदांना 28/06/2021 पर्यत उपलब्ध करून देणेचा अल्टीमेटम देवून पोहच घेतली व मगच प्रशासकांचे दालन सोडले.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संध्याकाळी उशिरा बँक बचाव समिति सदस्यांची भेट घेवून बँकेचे जलद वसूलीचा अँक्शन प्लँन बनवून त्याची सविस्तर माहीती बँक बचाव समितिला देणेचे आश्वस्त केले व बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी करणार नसलेचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here