Agriculture : रयत क्रांती संघटनेच्या दूध दरवाढ आंदोलनाची सरकारने घेतली दखल..

२५ जून रोजी मंत्रालयात बैठक..

पुणे (प्रतिनिधी) : रयत क्रांती संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली दि. १० जून रोजी संपूर्ण राज्यात दरवाढ आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले ,स्वतः सदाभाऊ खोत मुंबईत मंत्रालयासमोर दुधाचा कॅन घेऊन आंदोलन केले या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे त्या अनुषंगाने दि. २५ जून रोजी पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना.सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील प्रमुख शेतकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासंबंधीचे पत्र मंत्रालयातून सर्वांना पाठवण्यात आले आहे.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांच्या समवेत रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, युवाप्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर ,कार्याध्यक्ष दीपक भोसले राज्य प्रवक्ते सुहास पाटील व प्रवक्ते भानुदास शिंदे या रयत क्रांती संघटनेचा प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रणाची पत्र मंत्रालयातून पाठवण्यात आले आहे व हे सर्व जण उद्याच्या बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील.

लॉकडाऊनचे कारण सांगून सरकारी व खाजगी दूध संघ वाल्यांनी दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात पाडले आहेत.गाईच्या दुधाला प्रति लिटर २१ रुपये व म्हशीच्या दुधाला ३५ रुपये मिळतोय . शेतकऱ्यांना हा भाव परवडणार नाही ,एकीकडे पशुखाद्यचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत दुसरीकडे दुधाला कमी भाव मिळत आहे, हे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे ,कारण नगदी पैसे व भरवसाचा व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय शेतकरी करत असतात. यावर सरकारने गाईच्या दुधाला दुधाला किमान दर ३० रुपये व म्हशीच्या दुधाला किमान दर ६० रुपये प्रति लिटर किमान हमी भाव जाहीर करावा अशी भूमिका रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मांडली आहे.

राज्यातील खाजगी दूध संघाची मक्तेदारी असल्यामुळे मुद्दाम ठरवून दुधाचे दर पाडले जातात. याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही .त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नाही ,दुधाला हमीभाव मिळावा यासाठी रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसोबत आहे .बैठकीतील निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल.

आ. सदाभाऊ खोत

संस्थापक,

रयत क्रांती संघटना


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here