Public issue : आव्हाळवाडी, केसनंदचा “रहिवासी झोन” करा- जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांची मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

वाघोली, (प्रतिनिधी) : हवेली तालुक्‍यातील आव्हाळवाडी, केसनंद व मांजरी खुर्द गावांचे सर्वेक्षण करून गावठाण व रहिवासी झोन होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विभागास सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत कटके यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पीएमआरडीएचा विकास आराखडा पुढील एक महिन्यात तयार होणार आहे. त्यानंतर तो प्रसिद्ध होईल, अर्थात यावर सूचना मागवून त्याबाबत त्वरीत अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आव्हाळवाडी, केसनंद व मांजरी खुर्द या गावांबाबत गावठाण तसेच रहिवासी झोनची मागणी करण्यात आली आहे. याबाबत कटके म्हणाले, पुणे महानगरपालिका व खराडी आयटी पार्क शेजारी ही गावे असून स्वतंत्र महसुली गावे आहेत. या गावांसाठी गावठाण नाही तर संपूर्ण गावे गट नंबर मध्ये आहेत. बहुतांश भागामध्ये नागरी वस्त्या झालेल्या आहेत व मोठ्या प्रमाणात बांधकामेही झाली आहेत. बांधकाम करीत असताना रहिवासी झोन नसल्याने बांधकाम परवानगी घेणे व बांधकाम नकाशे मंजुर करण्यात नागरीकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या गावांचे सर्वेक्षण करून गावठाण व रहिवासी झोन होण्यास संबंधित विभागास सूचना करण्यात याव्यात, अशी विनंती मंत्री शिंदे यांना करण्यात आली आहे.


दरम्यान रिंगरोडचे काम पहिल्या टप्प्यात पुण्याच्या पुर्व भागातून सुरू होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या गावांचा झोन बदलणे गरजेचे असून बांधकामांबाबत येणाऱ्या अडचणीही यातून दूर होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले.

दरम्यान पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार होत असून तो प्रसिद्ध करण्यात आल्यावर सूचना मागवून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून आलेल्या सूचनांनुसार बदलांस प्राधान्य देण्याबाबत पीएमआरडीए आयुक्‍त डॉ. सुहास दिवसे यांनी सकारात्मक भुमिका घेतली असल्याचेही ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले.

26 COMMENTS

  1. I think this is one of the most important information for me.
    And i am glad reading your article. But should remark on some general things, The website
    style is great, the articles is really excellent : D.
    Good job, cheers

    Also visit my web blog :: delta 8

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here