कुख्यात नयन तांदळे टोळीविरुद्ध मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र…


नगर : जबरी चोरी, दरोडा, लुटमार यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे व टोळी विरुद्ध अहमदनगर पोलिसांनी मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त व पोलिस महासंचालकांची परवानगी मिळविली होती. दरम्यान मिटके रजेवर असल्याने संगमनेर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी आज हे दोषारोपपत्र दाखल केले.

संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीत कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे व टोळी विरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात 25 डिसेंबर 2020 रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वीही जबरी चोरी दरोडे लूटमार असे अनेक गुन्हे तांदळे टोळी विरुद्ध दाखल आहेत. नुकताच तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचा गुन्हा तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दाखल केला होता.

सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) नयन राजेंद्र तांदळे (टोळी प्रमुख)
1) सूपा 504/20 IPC 399, 402
2) सुपा 111/ 17 IPC 379, 34, 411
3) तोफखाना 6663/20 IPC 394, 365, 34…
4) तोफखाना 1756/19 ipc 393, 34.
5) तोफखाना 1715/19 ipc 392, 34
6) तोफखाना 1607/19 ipc 392 , 323, 34 7) तोफखाना 1546/19 ipc 394, 323, 34 8) तोफखाना 1765/19 ipc 392 ,34.
2) विठ्ठल साळवे
1) सुपा 505/ 20 IPC 399, 402
2) सुपा 111/17 IPC 379, 34. 3)तोफखाना 6663/20 IPC 394, 365 34
3) अक्षय ठोंबरे
1) सुपा ipc 399, 402
4) शाहुल पवार
1) सुपा 505/20 IPC 399, 402.
2) सुपा 153/ 17 ipc 341, 394,396, 34
3) 87/ 17 IPC 394,397, 34 4) 23/15 ipc 379, 354, 323….
5) अमोल पोटे
1) सुपा 505/ 20 IPC 399, 34
2) 86/17 ipc 394, 397, 34
3) 118/ 15 सुपा ipc 379, 34

सदर टोळी विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करणे करिता विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. हा प्रस्तावास दि.18 मार्च 2021 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास श्रीरामपूरचे Dy.s.p.संदीप मिटके यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नयन तांदळे टोळी विरुद्ध त्यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र तयार केल्याचा अजून एक गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.I 419/2021भा.द.वि. क.379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल केला होता.
सदर गुन्ह्यात कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ii) ,3(2), व 3(4) मोक्का अन्वये मा अपर पोलीस महासंचालक सो (का व सू) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक No.DGP/23/54/MCOCA/28/2021दिनांक 22/06/2021 अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. Dy.s.p.संदीप मिटके हे रजेवर असल्याने सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र संगमनेर Dysp राहुल मदने यांनी आज दिनांक 24/06/2021 रोजी मोका न्यायालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here