Agriculture : कृषी दिनानिमित्त भेंडा येथील दत्तात्रय नवले यांचा सन्मान

पीक स्पर्धेत नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांक 

नेवासे : पीक स्पर्धेतील विजेते दत्तात्रेय नवले, संदीप वाबळे, मारुती शिंदे समवेत दत्तात्रेय डमाळे, शीतल मैड, डॉ. अशोक ढगे आदी.  

नेवासा(तालुका प्रतिनिधी):– तालुका कृषी विभाग व पंचायत समितीच्यावतीने कृषी दिननिमित्त रब्बी हंगाम  पीक स्पर्धा 2020 यावर्षातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.  यास्पर्धेत भेंडा खुर्द येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय नवले यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

कृषी दिनानिमित्त गुरुवार दि.1 जुलै रोजी नेवासे पंचायत समिती सभागृहात  झालेला कार्यक्रम सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपसभापती किशोर जोजार, डॉ. अशोक ढगे, तालुका कृधी अधिकारी दत्तात्रय डमाळे, कृषी अधिकारी शीतल मैड, ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्र दहिगावने’चे  डॉ भास्कर आदींच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी पीक स्पर्धेतील  दत्तात्रय  नवले ( रा.भेंडा खुर्द, प्रथम क्रमांक ), संदीप वाबळे ( रा. अंतरवाली, द्वितीय क्रमांक), मारुती शिंदे (रा. जळके बुद्रुक, तृतीय क्रमांक ) या प्रयोगशील शेतकऱयांचा सभापती रावसाहेब कांगुणे, कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.       

यावेळी मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी,  राम ढोकणे, प्रमोद गावडे यांच्यासह कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here