इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा..

श्रीरामपूर / माळवडगाव
येथे इंधन, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ विरोधात बैलगाडी आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर गॅस टाक्या ठेवून इंधन दरवाढीची होळी केली.
 ना.बाळासाहेब थोरात, आ लहु कानडे, उपनगराध्यक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर माऊली मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर , प्रदेश सचिव अक्षय नाईक, मुठेवाडगाव सरपंच सागर मुठे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष योगेश आसणे, सुरेश पवार,  विशाल कांबळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीच्या सर्वच फ्रंटल च्या वतीने इंधन दरवाढ, खाद्यतेल दरवाढ व गॅसच्या वाढलेल्या दराच्या विरोधात निषेध बैलगाडी, चूल आंदोलन श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे करण्यात आले.
 याप्रसंगी अंदोलन कर्त्यांनी  बैलगाडीतून निषेधपर घोषणाबाजी केली.
यावेळी  माळवाडगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष सुदामराव आसने, दत्तात्रय दळे ,विठ्ठल आसणे ,रामेश्वर बोर्डे,नानासाहेब आसणे  ग्रामपंचायत सदस्य संजय आसने, सुनील शिंदे,प्रमोद आसने,दिगंबर आढाव,योगेश शिंदे,अशोक खताल,सोपानराव मुठे,हरिभाऊ बनसोडे, नरेंद्र आसने, नितीन बोर्डे, जालिंदरआबा आसने,अंकुश आसने, बापू दले,उत्तमराव आसने, श्रीकांत दळे, पोलिस पाटिल संजय आदिक, अशोक आसने, राजू दरेकर, धनंजय आसने,राजू काझी, भानुदास हुरूले, बाबूराव दळे  आदी ग्रामस्त उपस्थित होते.
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here