शाळेची घंटा वाजली… 

पहिल्याच दिवशी उत्साही उपस्थिती

ओतूर :
ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयात आजपासून इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सर्व शासकिय नियमांचे पालन करून सुरु झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
शाळेमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून विद्यालयात ८वी ते १oवी ७९५ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गट दिवसाआड म्हणजे आठवडयातून तीनच दिवस शाळेत येणार आहे. सकाळी १०ते १ पर्यंत सहा तासिका होणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी असणार नाही. शाळेत येताना स्वत:ची पाण्याची बाटली, सॅनिटायझर बॉटल व शालेय दफ्तर घेऊन येण्यास परवानगी आहे.
सोमवारी (दि.१९) शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद दिसला. पहिल्या तासाचे शिक्षक वर्गावर येताच एकाच आवाजात सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना नमस्कार केला व कोरोनाचे संकट लवकर दूर होवो व आमची शाळा नियमित अशीच चालू राहो, अशी प्रार्थना केली.
विद्यालय सुरु करण्यापूर्वी गावातील तीन शाळांचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, बसिर शेख व माने, ओतूरचे सरपंच गीता पानसरे, आरोग्य अधिकारी डॉ.सारोक्ते, कामगार तलाठी राहुल पंधारे, ग्रामसेवक प्रदीप खिलारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पंचायत समिती जुन्नरचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परीषद सदस्य मोहित ढमाले, संस्था प्रमुख अनिल तांबे, वैभव तांबे, नितिन पाटील यांची सहविचार सभा झाली. सर्वांनी विद्यालय  सुरू करण्याचा प्रस्तावास मंजूरी दिली. त्यानंतर इयत्तावार पालकांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. पालकांनी देखील शाळा सुरू करण्यास एकमुखाने मान्यता दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here